लोककलाकारांच्या माध्यमातून होणार कोविडविषयक जनजागृती
कलाकार निवड समितीवर सोलापूर जिल्ह्यातून डॉ. रविंद्र चिंचोलकर, मच्छिंद्र भोसले
सोलापूर (विशेष प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाने लोककलाकारांच्या माध्यमातून कोविड विषयक जनजागृती करण्याचा निर्णय घेतला अाहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून लोककलाकारांची निवड करण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात लोककलाकार निवड समिती सदस्य नियुक्त केले आहेत. यात सोलापूर जिल्ह्यातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. रविंद्र चिंचोलकर तसेच मंगळवेढा येथील लोककला अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र लक्ष्मण भोसले यांची निवड करण्यात आली आहे.
याबाबतची माहिती सोलापूर श्रमिक पत्रकार संघात शुक्रवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
कोविड काळात सर्व प्रकारच्या सांस्कृतिक उपक्रमावर बंदी आली आहे. त्यामुळे राज्यातील लोककलाकारांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. या लोककलावंतांना मदतीचा हात देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोरोना विषयक जाणीव जागृतीचे काम लोककलाकारांना देण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील पारंपरिक लोककलावंतांची माहिती गोळा करण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील लोककलावंतांची माहिती जमा करण्यासाठी निवड समिती सदस्यांची नियुक्त करण्यात आलेली असून ही समिती जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून लोककलाकारांची निवड करण्यात करण्यासाठी अर्ज मागवत आहे. यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर समन्वयक नियुक्त केले जाणार आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्री. बिभीषण चवरे यांनी राज्यस्तरावर जी कलाकार निवड समिती केली आहे त्याच्या अध्यक्ष सहसंचालक श्रीमती मीनल जोगळेकर आहेत. यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील 35 सदस्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील लोककलावंतांच्या मदतीसाठी महाराष्ट्र शासनाने पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. लोककलावंतांच्या माध्यमातून कोविड लसीकरण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजने संदर्भात जाणीव जागृती केली जाईल. निवड करण्यात आलेल्या कलाकारांना एका दिवशी पाचशे रुपये मानधन स्वरुपात मिळणार आहेत. एका त्यातून प्रत्येक कलाकारास पाच हजार रुपये मानधन मिळेल अशी ही योजना आहे.
हेही वाचा :
कोव्हिशिल्डचा तिसरा बूस्टर डोसही आवश्यकच : डॉ. सायरस पुनावाला
“चिंच विसावा” कृषी पर्यटन केंद्र बनलंय पर्यटकांचं आकर्षण
विद्यापीठे व महाविद्यालये लवकरच सुरू करणार : उच्च शिक्षणमंत्री सामंत