रुक्मिणी (आक्का) कांबळे यांचे दुःखद निधन
माजी प्राचार्य विजयकुमार कांबळे यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर
सांगोला : विद्या विकास मंडळ जवळे संस्थेचे माजी प्राचार्य विजयकुमार कांबळे सर डोंगरगाव (सांगोला) यांच्या मातोश्री रुक्मिणी (आक्का) कांबळे यांचे दुःखद निधन झाले. तिसऱ्या दिवसाचा विधी शुक्रवार ८/१०/२०२१ रोजी सकाळी ७:३० वाजता सांगोला येथे होईल. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, चार नातू असा मोठा परिवार आहे.
प्रतिकूल परिस्थितीत मुलांना घडविले
रुक्मिणी (आक्का) कांबळे यांनी प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मुलांना घडविले. त्यांचे सुपूत्र विजयकुमार कांबळे यांनी जिद्दीने उच्च शिक्षण घेऊन प्राचार्य पदापर्यंत झेप घेतली. माजी प्राचार्य कांबळे यांची मुलेही विविध क्षेत्रात नाव कमावत आहेत.
रुक्मिणी (आक्का) कांबळे यांच्या निधनामुळे कांबळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे- पाटील यांच्यासह राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी माजी प्राचार्य कांबळे यांचे सांत्वन केले आहे.