रिंकूचा फिटनेस पाहून चाहते ‘सैराट’
नव्या रुपासह रिंकू प्रेक्षकांच्या भेटीला
‘सैराट’मध्ये ‘आर्ची’ या भूमिकेत अतिशय उठावदार अभिनय करणारी अभिनेत्री रिंकू राजगुरु आता बऱ्याच अंशी बदलली आहे. तीने आपल्या इन्स्टाग्रामवर नव्या लुकमधील फोटोज शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
सैराटमध्ये जाडजूड किंवा मजबूत शरीरयष्टीची दिसणारी रिंकू आता खूपच बदलली आहे. तिने डायटिंग व व्यायाम सुरु केल्याचे दिसते. फिटनेसनंतरचा लूक दाखविणारे काहा फोटोज तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेत.
रिंकूचा बदललेला अंदाज यापूर्वीसुद्धा अनेकांची मनं जिंकून गेला होता. सध्या हीच रिंकू तिच्या फिटनेसमुळं नेटकऱ्यांची दाद मिळवत आहे. व्यायाम, वर्कआऊटदरम्यानचे काही व्हिडिओ आणि फोटो शेअर करणाऱ्या रिंकूचा हा अंदाज पाहून नेटकरी खऱ्या अर्थानं सैराट होत आहेत हेच खरं.
येत्या काळात अभ्यास, करिअर सांभाळून रिंकू आता या नव्या रुपासह कोणत्या नव्या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.