राज्यात येत्या चार दिवसांत गारपिट, अवकाळीचा इशारा
नव्या संकटाची भीती
पुणे : भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी राज्यात पुढील 4 दिवस काही भागात अवकाळी पाऊस (unseasonal rains) आणि गारपिट (Hailstorm) होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
9 जानेवारी रोजी बुलडाणा, जालना, परभणी, नांदेड, अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली,जळगाव, औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद येथे पाऊस पडेल. तसेच 10 जानेवारी रोजी अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, जालना, बीड, हिंगोली, परभणी, लातूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे.
नाशिक, नंदूरबार आणि धुळे, पालघर, अहमदनगर व जळगाव जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. 9 जानेवारी (January) रोजी विदर्भात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. तसेच बुलडाणा, जालना, परभणी, नांदेड, वर्धा, उस्मानाबाद येथे पाऊस पडेल.
देशाच्या उत्तरेकडील भागात पश्चिमी विक्षोभमुळे दहा जानेवारीपर्यंत काही भागात ढगांचा गडगडाट, विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर 9 जानेवारी रोजी विदर्भात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.
वातावरणात सध्या गारवा असला तरी राज्यातील काही भागात याची तीव्रता कमी-जास्त आहे. काही भागात तर ढगाळ वातावरण दिसत असून हवामानामध्ये बदल झालेला दिसतोय. मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रात काही भागात विजांच्या कडकडाटास पाऊस तर दुसरीकडे रात्रीच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. (warning)
राज्यात 7 ते 10 जानेवारी या कालावधीत पावसाची शक्यता आहे. या चार दिवसात उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस बरसू शकतो. तर विदर्भात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. 7 जानेवारीपासून उत्तर महाराष्ट्रात (maharashtra) तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज ( Guess) व्यक्त करण्यात आलाय.
आगामी चार दिवस ( four days) राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे हुडहुडी (Hudhudi) कमी झाली असली तरी अजूनही वातावरणात गारवा जाणवत आहे. काही ठिकाणी थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे त्याचा फायदा गहू, ज्वारी, हरभरा या पिकांना होतोय.या पिकांना थंडीचे वातावरण ( Cold weather) चांगले पोषक असते. पोषक वातावरण मिळाल्याने उगवण चांगली होऊन पिकांची वाढ जोमात होते. सध्याचा गारवा या पिकांसाठी संजिवनी (Sanjivani) ठरणार आहे.