राज्यातील महामार्गांवर जीव वाचवतील मृत्युंजय दूत

डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची भावनिक साद

Spread the love

सोलापूर दि.७ : – भारतामध्ये दरवर्षी रस्ते अपघातांमध्ये दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. रस्ते अपघातांमध्ये विश्‍लेषण केल्यानंतर असे दिसून येते की, बऱ्याचदा अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्तांना योग्य उपचार मिळत नाही, योग्य वेळी रुग्णालयात नेले जात नाही, किंवा अपघातग्रस्तांना रुग्णालयात नेताना जखमी व्यक्तीस अज्ञानाने हाताळल्यामुळे जखमी व्यक्तीच्या शरीरात अधिक इजा होते व प्राणीहानीचे प्रमाण वाढते.समाजातील चांगले लोक अपघातग्रस्तांना मदत करतात, परंतु बरेच लोक पोलिसांच्या किंवा न्यायालयाचा ससेमिरा टाळण्यासाठी अपघातग्रस्तांना मदत करत नाहीत. तसेच अपघातग्रस्त किंवा जखमी व्यक्ती अनोळखी असल्यास रुग्णालयात किंवा दवाखान्यात उपचार करण्यास वेळ लावतात याकरता गोल्डन आवर मध्ये अपघात ग्रस्तांना व्यवस्थित रित्या नेत्या यावे व त्यांना योग्य उपचार त्वरित मिळावे याकरिता, अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक महाराष्ट्र राज्य मुंबई- डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेनुसार हायवे मृत्युंजय दूत ही योजना राज्यातील महामार्गावर राबविण्यात येत आहे.

महाराष्ट्रात सध्या जवळपास ५०७ मृत्युंजय दूतांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच जवळपास ४०० लोकांचे सदर दूताने प्राण वाचवले आहे.

महामार्ग पोलीस मदत केंद्र पाकणी जिल्हा सोलापूर येथील महत्त्वाचे राष्ट्रीय आणि राज्य महामार्गा वरील सर्व मॉल, पेट्रोल पंप, लोकल-धाबा किंवा हॉटेल मध्ये काम करणारे तसेच महामार्गाचे आजूबाजूच्या गावातील सुमारे १४५ मृत्युंजय दूत सदस्य आहेत. हे सर्व मृत्युंजय दूत अपघातातील जखमींना कशाप्रकारे हाताळावे याचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. काही मृत्युंजय दूत यांना स्ट्रेचर व प्राथमिक उपचाराचे साहित्य देण्यात आलेली आहे. ॲम्बुलन्स १०८ बाबत माहिती देण्यात आलेली आहे. लवकरच सर्व मृत्युंजय दूतांना ओळखपत्र देण्याचे काम चालू आहे.

ही योजना कार्यान्वित झाले असून अपघात ग्रस्तांना तात्काळ मदत मिळण्यास मदत होत आहे. महामार्गावरील लोक तात्काळ अँब्युलन्स कॉल करीत आहेत. जखमींना रोडच्या कडेस नेण्यास मदत होत आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्र पोलीस केंद्र पाकणी येथे सुमारे १० अपघातग्रस्त लोकांचे प्राण वाचविण्यात आले आहे.पाकणी येथील महादेव भोसले आणि धनाजी लक्ष्‍मण भोसले यांनी चार अपघात ग्रस्त लोकांना धाडसाने प्राण वाचल्याबद्दल त्यांचा महामार्ग पोलीस केंद्रातर्फे सत्कार करून त्यांना प्रोत्साहित करण्यात आलेले आहे.

डॉ. भूषणकुमार उपाध्याय

महामार्ग पोलीस मदत केंद्र पाकणी जिल्हा सोलापूर यांच्या वतीने प्रत्येक नागरिकांना आवाहन करण्यात येते की सदर मृत्युंजय दूत योजनेत सहभागी व्हावे व अपघातात जखमी लोकांना तात्काळ मदत करावी व लोकांचे जीव वाचवण्याचे चांगले काम करावे जखमींना मदत केल्यामुळे कोणालाही कोणत्याही प्रकारचे फायदेशीर ससेमिरा लागणार नाही याबाबत भारताचे राजपत्र २१ जानेवारी २०१६ अन्वये कळविण्यात आलेले आहे.तरी सर्व नागरिकांना जखमींना तात्काळ मदत करणे कामी सहकार्य करावे, असे आवाहन महामार्ग पोलिस मदत केंद्राचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आय.ए.सय्यद पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय खरात, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार लठ्ठे, पोलीस उपनिरीक्षक हेमंत काटे यांनी केले आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका