राखी सावंत X आदिल खान
नवऱ्याचे दुसऱ्या मुलीशी लफडे असल्याचा राखीचा दावा
थिंक टँक / नाना हालंगडे
ड्रीम गर्ल राखी सावंत आणि तिचा पती आदिल खान याच्या लग्नाला महिना होत नाही तोवर या नात्यात वितुष्ट आले आहे. राखी सावंत हिने पती आदिल खानवर गंभीर आरोप केले आहेत. आदिल याचे इतर मुलीसोबत लफडे असल्याचा दावा राखी सावंत हिने केला आहे.
“त्याने कुराणवर हात ठेवून…”
मॉडेल व अभिनेत्री राखी सावंत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच तिच्या आईचं निधन झालं. त्यानंतर राखीचा पुन्हा लग्नाबाबत नवा ड्रामा सुरू झाला आहे. आता राखीने पती आदिल खानवर गंभीर आरोप केले आहेत.
राखीने आदिल खानचं दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर असल्याचा खुलासा केला आहे. राखीचा एक व्हिडीओ ‘विरल भय्यानी’ या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये राखीने आदिलवर गंभीर आरोप केले आहेत. बिग बॉस मराठीच्या घरात असताना आदिलचं दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर सुरू असल्याचंही राखी म्हणाली आहे.
“माझा वापर करुन आदिलला प्रसिद्धी मिळवायची होती. आदिल खोटारडा आहे. माझ्याकडे त्याच्याविरोधातील सगळे पुरावे आहेत. आदिलचं दुसऱ्या मुलीबरोबर अपेअर सुरू आहे. कुराणवर हात ठेवून त्याने त्या मुलीला ब्लॉक करण्याचं वचन दिलं होतं. पण त्याने तसं केलं नाही. आता ती मुलगी आदिलला ब्लॅकमेल करत आहे. आदिलला फक्त लोकप्रियता हवी होती. मला कोणालाही मोठं बनवायचं नाही. त्यामुळे तुम्ही त्याच्या मुलाखती घेऊन त्याला प्रसिद्धी मिळवून देऊ नका”, असं म्हणत राखीने आदिल खानवर गंभीर आरोप केले आहेत.
https://www.instagram.com/reel/CoKBwDCDBqn/?igshid=YmMyMTA2M2Y=
राखी सावंत व आदिल खानने मे महिन्यात कोर्ट मॅरेज केलं होतं. परंतु, लग्नाच्या सात महिन्यांनी राखीने तिच्या लग्नाचा खुलासा केला होता. तेव्हाही बऱ्याच दिवसांच्या ड्रामानंतर आदिलने राखीबरोबर लग्न केल्याचं मान्य केलं होतं. आदिलच्या अफेअरमुळे संसारात वादळ आल्याचं राखीने म्हटलं आहे.