थिंक टँक / नाना हालंगडे
अभिनेत्री राखी सावंतवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्री राखी सावंतची आई जया सावंत यांचं शनिवारी निधन झालं आहे. त्याच्यावर मुंबईमधील रुग्णालयात ब्रेन ट्युमरवरील उपचार सुरु होते.
जया सावंत यांनी मुंबईतील क्रीकेअर रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून राखी सातत्याने तिच्या आईच्या तब्बेतीसंदर्भातील अपडेट्स शेअर करत होती. राखीने रुग्णालयामधील व्हिडीओ शेअर करत आईवर उपचार सुरु असल्याचं तिच्या चाहत्यांना सांगितलं होतं.
राखीने तिच्या चाहत्यांना आपल्या आईसाठी प्रार्थना करावी अशीही विनंती केली होती. मात्र आज राखीच्या आईचं उपचादारादरम्यान निधन झालं.
मागील तीन वर्षांपासून जया सावंत यांना प्रकृतीसंदर्भातील गंभीर आजारांनी ग्रासलं होतं. राखी अनेकदा आपल्या आईच्या आजरपणादरम्यानच्या उपचाराचे व्हिडीओ इन्स्टाग्रामवरुन शेअर करायची.
तिने सोशल मीडियावरुन आपल्या आईच्या प्रकृतीबद्दल अनेकदा भाष्य केलं आहे. राखीने आपल्या आईवरील उपचारांसाठी सलमान खानने अनेकदा मदत केल्याचा उल्लेख केला होता. सलमान अनेकदा आईच्या तब्बेतीसंदर्भात चौकशी करतो असंही राखी म्हणाली होती.
जया सावंत यांनी मुंबईतील क्रीकेअर रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून राखी सातत्याने तिच्या आईच्या तब्बेतीसंदर्भातील अपडेट्स शेअर करत होती. राखीने रुग्णालयामधील व्हिडीओ शेअर करत आईवर उपचार सुरु असल्याचं तिच्या चाहत्यांना सांगितलं होतं.
जया सावंत यांच्या निधनानंतर चित्रपट क्षेत्रातील कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.