मोदी गेला, आता सोन्या करतोय मालामाल
सांगोल्यातील मेंढ्याची चर्चाच चर्चा
थिंक टँक / नाना हालंगडे
सांगोला तालुका हा तसा माणदेशी पट्ट्याचाच एक भाग. या भागात मेंढी आणि शेळी पालन मोठ्या प्रमाणात होते. अशाच एका मोदी नावाच्या मेंढ्याने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले होते. आता त्याच मोदीचे पिल्लू असलेला सोन्या नावाचा मेंढा मालकाला करोडपती बनवत आहे.
वाचा नेमका प्रकार आहे तरी काय
बाबू मेटकरी यांच्या मोदी नावाच्या मेंढ्याची देशभर चर्चा झाली होती. माडग्याळ जातीच्या या मेंढ्याला 71 लाखाची मागणी झाल्याने हा मेंढा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला होता . दुर्दैवाने या मोदी मेंढ्याचे कोरोना काळात निधन झाले. आता त्याचे पिल्लू असलेल्या सोन्याने आता सोन्याचे दिवस आणले आहेत.
सोन्या सोबतची पिल्ले 10 ते 15 लाखाला एक याप्रमाणे विकली होती. मात्र बाबू यांनी सोन्या आणि त्याच्या जोडीचे एक पिल्लू ठेवले आणि आज त्यालाच 55 लाखांची किंमत आली आहे. गेल्यावर्षी पत्र्याच्या घरात राहणाऱ्या बाबू मेटकरी यांना मोदींच्या एकाच पिल्लाने आलिशान बंगला बांधून दिला.
जमीन देखील खरेदी करून दिली. माडग्याळ जातीच्या तशा शेकडो मेंढ्या महाराष्ट्र आणि कर्नाटक भागात दिसतात. मात्र यातील जातिवंत मेंढे खूपच कमी आहेत. यातील मेटकरी यांचा सर्जा हा मेंढा देशभरात प्रत्येक बाजारात अव्वल येऊ लागल्याने त्याला मोदी हे नामकरण केले होते.
याच मोदीचा मेंढा असलेला सोन्या आता पुन्हा चर्चेत आला आहे तो वर्षाच्या वयात असून त्याला 55 लाखाला मागणी आल्याने पुन्हा एकदा बाबू मेटकरी चर्चेत आले आहेत.
असा आहे मोदीचा सोन्या
मोदीचा वारसदार असलेला सोन्या देखणापान आहे. तो सहा फूट लांब, मोठा गळा, चंद्रकोरीसारखे नाक असा देखणा आहे. सोन्या केवळ दीड वर्षाच्या वयात आपला बाप मोदीप्रमाणे रुबाबदार दिसू लागला आहे.
असा असतो सोन्याचा खुराक
या सोन्याचा खुराक देखील राजेशाही असतो. त्याला दररोज दोन वेळेला लिटरभर दूध लागते. सरकी, मका, ज्वारी, भुईमुगाचे वेल असे खाद्य या सोन्याचा लागते. एखाद्या लाडक्या लेकराप्रमाणे ते त्याचा लाड करतात. सोन्याच्या पिल्लाना देखील सोन्याची मागणी येऊ लागल्याने त्यातून वर्षाला कोटभर रुपये मिळत असल्याचे मेटकरी सांगतात.
द्यावे जीआय मानांकन
माणदेशी खिलार आणि बोकड-बकऱ्यांना जीआय (भौगोलिक ओळख) मानांकन द्यावे अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे.
हेही पाहा
पुढील दोन महिन्यात जगावर भीषण संकट! बाबा वेंगा यांचे धडकी भरवणारे भाकीत | Think Tank Live