मेंढ्यांच्या कळपाला भरधाव ट्रकने चिरडले; १०२ मेंढ्या ठार, ४० जखमी
अमरावतीच्या परतवाडा मार्गावरील घटना
अमरावती : रस्त्याच्या कडेवरुन जाणाऱ्या मेंढ्यांच्या कळपाला भरधाव ट्रकने चिरडल्याने १०२ मेंढ्या ठार तर ४० जखमी झाल्या. अमरावतीच्या परतवाडा अंजनगाव सुर्जी मार्गावर परतवाडापासून सहा किलोमीटर अंतरावर ही घटना घडली आहे.
अंजनगावच्या दिशेने जाणाऱ्या जवळपास दीडशे मेंढराच्या कळपात एक भरधाव ट्रक घुसल्याने 102 मेंढ्या चिरडल्या. अपघातात 40 पेक्षा जास्त मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहे त्यामुळे मेंढी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. सकाळी सात ते आठच्या सुमारास राजस्थान मधील मेंढपाळ हे आपल्या मेंढया घेऊन परतवाडा ते अंजनगाव रस्त्यावर अंजनगाव कडे जात होत्या. याच दरम्यान परतवाडा वरून अंजनगाव सुर्जीकडे जाणारा भरधाव ट्रक या मेंढराच्या कळपात घुसला. या मध्ये 102 मेंढ्या चिरडल्या गेल्याने त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर 40 पेक्षा अधिक मेंढ्या यामध्ये जखमी झाल्या.
हा अपघात एवढा भीषण होता की अक्षरश या महामार्गावरून रक्ताचा सडा पडला.
दरम्यान घटनास्थळी पोलिस पोहोचले असून या घटनेचा तपास केला जात आहे. दरम्यान ट्रक चालकाच्या निष्काळजी पणामुळे मेंढ्या चिरडल्या गेल्याचा आरोप मेंढपाळाने केला असून ट्रक चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी मेंढपाळाने केली आहे.
अमरावतीच्या परतवाडा अंजनगाव सुर्जी मार्गावर परतवाडा पासून सहा किलोमीटर अंतरावर अंजनगावच्या दिशेने जाणाऱ्या जवळपास दीडशे मेंढराच्या कळपात एक भरधाव ट्रक घुसल्याने 102 मेंढ्या चिरडल्या गेल्याची धक्कादायक घटना सकाळच्या सुमारास घडली. या अपघातात 40 पेक्षा जास्त मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहे. त्यामुळे या मेंढपाळांचे 10 लाखांचे नुकसान झाले असल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात आले.