मुस्लिमांच्या मशिदी, घरांवर होत असलेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ सांगोल्यात उद्या धरणे आंदोलन
बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे करणार आंदोलन
थिंक टँक न्यूज नेटवर्क
त्रिपुरा राज्य येथे गेल्या जवळपास १२ दिवसांपासून मुस्लिमांची घरे, मशिदीवर कट्टरतावादी संघटनांकडून होत असलेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ सांगोल्यात उद्या ८ रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांनी दिली.
बापूसाहेब ठोकळे म्हणाले की, त्रिपुरा राज्य येथे गेल्या जवळपास १२ दिवसांपासून मुस्लिमांची घरे, मशिदीवर कट्टरतावादी संघटनांकडून हल्ले, अन्याय अत्याचार चालू असून या अन्याय संदर्भात संबंधित ठिकाणी न्याय मागण्याचे काम चालू आहे. याचाच एक भाग म्हणून शांततामय पद्धतीने उद्या रीतसर गृह विभाग व संबधीत अधिकारी यांच्या परवानगीने सांगोला येथे बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने धरणे आंदोलन सांगोला तहसील कार्यालय येथे सकाळी ११ वाजले पासून करण्यात येणार आहेत.
यावेळी राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा कार्याध्यक्ष – इरफान फारूखी सोलापूर, सागर पवार -छत्रपती क्रांती सेना कार्याध्यक्ष सोलापूर, संदीप ठोकळे बहुजन मुक्ती पार्टी – शहर अध्यक्ष सांगोला, मा. कमरुद्दीन काझी बी. एम. पी. अध्यक्ष सांगोला इत्यादी पदाधिकारी , कार्यकर्ते हेही उपस्थित होते.