मुख्यमंत्र्यांचा गोंधळ! चुकून यशवंत मनोहरांना वाहिली श्रद्धांजली

नागपूर : थिंक टँक न्यूज नेटवर्क
नेत्यांचे सोशल मीडिया अकाऊंट चालविणारे लोक (हॅण्डलर) आपल्या घोडचुकांमुळे आपल्या नेत्याला कसे अडचणीत आणू शकतात याचा प्रत्यय नुकताच आला. निधन झाले एका व्यक्तीचे आणि श्रध्दांजलीच्या पोस्टमध्ये चुकून दुसऱ्याच जिवंत साहित्यिकाचा फोटो वापरण्यात आला. ही चूक काही वेळात दुरुस्त करण्यात आली. मात्र तोपर्यंत पुलाखालून खूप पाणी निघून गेले होते.
त्याचे झाले असे, मागील १६ वर्षांपासून विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्षपद भूषविलेले विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांचे निधन झाले. म्हैसाळकर यांच्या निधनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत दुखः व्यक्त केले. मात्र, मुख्यमंत्र्यांकडून मनोहर म्हैसाळकर यांच्याऐवजी ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक, विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांचा फोटो पोस्ट करण्यात आला. मात्र काही मिनिटांतच यशवंत मनोहर यांचा फोटो हटवून मनोहर म्हैसाळकर यांचा फोटो वापरण्यात आला. या प्रकारावरून आंबेडकरी कार्यकर्ते, अभ्यासक यांनी सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांचे नुकतेच निधन झाले होते. म्हैसाळकर यांच्या निधनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत दुखः व्यक्त केले. मात्र फोटोमध्ये मोठी चूक झाली.
मुख्यमंत्र्यांनी केलेली पोस्ट
“विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष, अभ्यासू वक्ता, भाषा अभ्यासक मनोहर म्हैसाळकर यांचे दुःखद निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने साहित्यक्षेत्राची अपरिमीत हानी झाली आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो व त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो, ही प्रार्थना!” असे ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष,अभ्यासू वक्ता,भाषा अभ्यासक मनोहर म्हैसाळकर यांचे दुःखद निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने साहित्यक्षेत्राची अपरिमीत हानी झाली आहे.परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो व त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो,हि प्रार्थना!
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 14, 2022
दरम्यान मुख्यमंत्र्याच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करताना गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या ट्विटर हँडलवरून ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर यांचा फोटो पोस्ट करण्यात आला. काही वेळानंतर हे ट्विट डिलीट करण्यात आले. फोटोही हटविण्यात आला. नव्याने ट्विट करण्यात आल्याने मुख्यमंत्र्यांचा गोंधळ झाल्याचे दिसून आले.
मनोहर म्हैसाळकर यांना किडनीच्या आजाराने ग्रासले होते. त्यांना गुरुवारी नागपुरातील एका खाजगी रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले होते. या रूग्णालयात त्यांनी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान अंतिम श्वास घेतला. त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई, बहीण, भाऊ, नातवंडे आणि बराच मोठा आप्त परिवार आहे.
प्रा. सुरेश द्वादशीवार यांचा १५ वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर २००६ साली त्यांनी विदर्भ साहित्य संघाची धुरा आपल्या हाती घेतली. मनोहर म्हैसाळकर २००६ सालापासून विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदाची धुरा एक हाती सांभाळत होते.
आंबेडकरी जनतेत संताप
मुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून झालेल्या चुकीबद्दल समाजात असंतोष निर्माण झाला आहे. आंबेडकरी साहित्यिक, विचारवंत, वक्ते, पत्रकार यांनी सोशल मीडियावर तीव्र नापसंदी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांनी यशवंत मनोहर यांची माफी मागायला हवी, अशीही मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.
असे का होते
ट्विटर किंवा इतर सोशल मीडियावरून पोस्टच्या माध्यमातून लाखो लोकांशी एकाच वेळी संवाद साधण्याची सोय आहे. मात्र सोशल मीडिया अकाऊंट चालविणारे हे ते नेते स्वतः नसतात. यासाठी स्वतंत्र यंत्रणा चालविली जाते. सोशल मीडिया हॅण्डलर नेमले जातात. बहुतांशी सोशल मीडिया पोस्ट हे हॅण्डलरच करतात. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आदी विविध क्षेत्रातील ज्ञान त्यापैकी अनेकांना नसते. त्यामुळे फोटो वापरताना किंवा नामोल्लेख करताना ते चुकतात, असे दिसते. मात्र या घोडचुकांमुळे नेते अडचणीत येतात, अशी वस्तुस्थिती आहे.
माझ्याकडून दुसरं काही शिकू नका, फक्त धाडस शिका : आ. शहाजीबापू पाटील
कोणत्या मोबाईलमध्ये Jio चा 5G सपोर्ट मिळेल? पाहा सर्व कंपन्यांच्या मोबाईलची यादी
बाबासाहेबांनी ब्राह्मणांना नव्हे ब्राह्मण्यवादाला विरोध केला : ना. रामदास आठवले