मुख्यमंत्री साहेब, बाकी काही राहूद्या, किमान वीजपुरवठा तरी व्यवस्थित करा

त्रस्त शेतकऱ्याचे मुख्यमंत्र्यांना अनाहुत पत्र

Spread the love

सद्या राज्यात महवितरण कंपनीचा मनमानी कारभार सुरू आहे. ऐन रब्बी हंगामात शेतीपंपाची वीज तोडणी मोहीम सुरू आहे. पण कोण्याही राज्यकर्त्यांना याचे देणेघेणे नाही. याच अनुषंगाने एका शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेले अनावृत्त पत्र.

मा. मुख्यमंत्री साहेब,
मी खेडेगावातील रहीवासी असून शेती व्यवसाय करतो. साहेब, विद्युत मंडाळाकडून रात्री 10:30 ते सकाळी 6:30पर्यंत लाईट दिली जाते. रात्रीच्या 8 तासातील 5 तासही वीज शेतकऱ्यांना मिळत नाही.

दिवसभर शेतात काम करून रात्री पाणी भरण्यासाठी रात्रभर शेतात ऊभे रहावे लागते. सध्या थंडीचा महीना असून ८ ते १० डिग्री तापमान असते.

शेतकऱ्यांबद्दल सरकारला एवढी चीड का आहे?
आम्ही रात्रभर का जागं राहायचं? ज्या कोणी हा निर्णय घेतला असेन तो अाम्हाला वैरी समजत असावा. रात्री शेतीला विज दिली असली तरी रात्री डी.पी वरील फ्यूज गेला तर तो टाकण्यासाठी मंडळाने रात्रीचे कर्मचारी दिलेले नसतात. आम्हा शेतकऱ्यांनात जीव धोक्यात घालून फ्यूज टाकावे लागतात.

येवढं करून आमच्या हातात काय पडतय?
आम्हाला वाटलं ५७ वर्ष वाटोळं झालं. अाता नवं सरकार आलं. चांगले दिवस येतील. पण घरातील मोठी माणसं सांगत होती काहीच फरक पडणार नाही. तरी आमची कोणाकडूनही अपेक्षा राहीली नाही पण जमते का बघा.

आहो साहेब रात्री घरातून बाहेर निघालो तर आई म्हणते भाऊ बूट घातले का? बायको टॉर्च देते, वडील म्हणतात काठी घेतली का?
मी येतो तुझ्याबरोबर. रात्री साप, विंचू, बिबट्या सारखी संकटे असतात.

मी शेतात अंधारात असतांना त्यांना झोप लागत असेल का हाे? मी तुमच्याकडे फार मोठी मागणी करत नाही. सहज शक्य आहे फक्त शेतीला दिवसा किमान १२ तास लाईट द्यावी ही विनंती?

आपला एक आशावादी शेतकरी.

(संकलन : नाना हालंगडे)

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका