मुंबई-चेन्नई मेल रेल्वे बंद झाल्याने केम येथील पासधारकांची गैरसोय

मुंबई-विजापूर फास्ट पॅसेंजरला थांबा देण्याची अनिरुद्ध कांबळे, अजित तळेकर यांची मागणी

Spread the love

केम (विशेष प्रतिनिधी) : मुंबई-चेन्नई मेल ही रेल्वेच्या नवीन वेळापत्रकानुसार बंद झाल्याने केम येथील पासधारकांचे व इतर प्रवाशांचे हाल होत आहेत. तरी मुंबई-विजापूर ही फास्ट पॅसेंजर गाडी नियमीत करून केम येथे थांबा मिळावा, अशी मागणी सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे व माजी सरपंच अजितदादा तळेकर यांनी केली आहे.

केमहून कुर्डुवाडी व सोलापूर जाण्यासाठी सकाळी सात वा. मुंबई-चेन्नई मेल होती. सोलापूर येथून सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी ही मेल सुटत होती. ती सायंकाळी केमला आठ वा. पोहचत होती. त्यामुळे या गाडीने कुर्डुवाडी, बार्शी, सोलापूर, पंढरपूरहून पासधारक व इतर प्रवासी येत होते. मात्र ही सोयीची मेल बंद झाल्याने विजापूर-मुंबई गाडीला थांबा दिल्यास सोय होईल.

ही गाडी आठवड्यातून चार दिवस आहे. सोमवार ते गुरुवार अशी आहे. त्यामुळे शुक्रवार ते रविवार सोलापूरहून येणारे पासधारक व प्रवाशी कसे येणार? त्यासाठी रेल्वेप्रशासनाने ही गाडी नियमित करून सोलापूरहून सायंकाली सहा वाजता सोडावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.

केम स्थानकावर पुणे सुपरफास्ट इंद्रायणी गाडीला सोलापूरला जाताना थांबा मिळावा. या मागण्यासाठी माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार व रेल्वे बोर्डाचे सदस्य रणजितसिंह निंबाळकर यांची भेट घेणार असल्याची माहिती अजित तळेकर यांनी दिली.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका