मार्गशीर्ष महिना चक्क वर्षाचा
जाणून घ्या धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व
थिंक टँक न्यूज नेटवर्क / नाना हालंगडे
तुम्ही चक्क कोड्यात पडला असाल. मार्गशीर्ष महिना वर्षाचा कसा? पण ते सत्य आहे. यंदाचा हा मार्गशीर्ष महिना 5 डिसेंबर 2021 रोजी आला असून, पुढच्या वर्षी म्हणजे 3 जानेवारी 2022 रोजी संपणार आहे.
मार्गशीर्ष हा एक भारतीय पंचांगानुसार वर्षातील नववा महिना आहे. यालाच अग्रहायण असेही म्हटले जाते. हा ३० दिवसांचा असतो. हा महिना सर्वोत्तम आहे असे श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितले आहे.
यावर्षी आलेला हा मार्गशीर्ष महिना चक्क पुढच्यावर्षी संपणार आहे. हा महिना देवदीपावली म्हणजे 5 डिसेंबर रोजी सुरू झाला असून, पुढच्या वर्षी 3 जानेवारी 2022 पर्यंत असणार आहे.
मासानां मार्गशीर्षोहम्
मार्गशीर्ष महिना हा श्रीकृष्णाचा अंत्यंत आवडता महिना मानला जातो,
हिंदू पुराणानुसार मार्गशीर्ष महिना हा पवित्र महिना मानला जातो.
मार्गशीर्ष महिन्याचे महत्व
याच महिन्यात दत्त जयंती येत असल्याने सर्व दत्तभक्तांमध्ये या महिन्याचे विशेष महत्व आहे. भगवद गीतेत भगवान श्रीकृष्णाने मार्गशीर्षाचे महत्व खालील श्लोकातून व्यक्त केले आहे.
श्रीकृष्णाने म्हटले आहे, “मासाना मार्गशीर्षोऽयम्।” याचाच अर्थ असा की मार्गशीर्ष महिना माझेच (भगवान श्रीकृष्णाचे) स्वरूप आहे. स्कंद पुराणात देखील या महिन्याचा महिमा गायला आहे. भगवान श्रीविष्णुला प्रसन्न करण्यासाठी उपासना करण्यासाठी हा अत्यंत अनुकूल महिना आहे. त्याचप्रमाणे दत्त भक्तांसाठीसुद्धा भगवान दत्तात्रेयांची उपासना, आराधना करून त्यांना प्रसन्न करण्यासाठी हा महिना अत्यंत योग्य आहे. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी ते मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशी या सप्ताहात गुरुचरित्राचे पारायण केल्यास त्यास विशेष महत्व आहे.
या सप्ताहाला “श्री गुरुचरित्र सप्ताह” असेही म्हणतात. यानंतर पुढील दिवशी म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. मार्गशीर्षातील गंगास्नानाचे पुण्य हे दहा लाख ग्रहण स्नानाएवढे मानले जाते, या महिन्यात विष्णूसहस्त्र नामाचे पाठ केले जातात.
मार्गशीर्ष महिन्यातील काही महत्त्वाची व्रते
सृष्टीची उत्पत्ती हि शीर्ष मार्गाने होते..म्हणजेच अर्भक हे खाली डोके आणि वर पाय या अवस्थेत जन्मास येते.व अध्यात्मिक दृष्ट्या विचार केल्यास याच अवस्थेत जगत असते. गुरूचा अनुग्रह (गुरुमुखातून नाम मिळाल्यानंतर ) मिळाल्यानंतर हे शीर्ष ऊर्ध्व होते.. शीर्ष भागास मार्ग प्राप्त होतो.
पुराण देवीभागवतामधून मार्गशीर्षातील देवव्रताचे माहात्म्य फलश्रुतीसह विरेचीत केले आहे.
मार्गशीर्षात लक्ष्मीचे जे गुरवार केले जातात त्या खेरीस, श्रीविष्णूची आराधना व केशरी २८ गुरुवरांचे व्रत देखील करतात. यात श्रीविष्णूची व श्री महालक्ष्मीची शास्त्रोक्त पूजा, श्री सूक्ताचे पठण, विष्णू सहस्त्रनामावली , उपवास यांचा समावेश होतो.
मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी ते मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशी या सप्ताहात गुरुचरित्राचे पारायण केल्यास त्यास विशेष महत्व आहे. या सप्ताहाला “श्री गुरुचरित्र सप्ताह” असेही म्हणतात. यानंतर पुढील दिवशी म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते.
१) देवदिवाळी व्रत : मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला हे व्रत करतात.या दिवशी आपल्या कुलस्वामिनीला पक्वान्नांचा नैवेद्य दाखवतात. भोपळ्याचे गोड घारगे बनवून त्याचा देखील नैवेद्य दाखवतात.
२)आरोग्यसप्तमी व्रत :एक वर्ष हे व्रत करावे. मार्गशीर्ष सप्तमीस प्रारंभ करावा. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध सप्तमीस सूर्यपूजा तसेच उपवास करावा.या व्रतामुळे आरोग्य व समृद्धीची प्राप्ती होते.
३) लवणदान : मार्गशीर्ष पौर्णिमेस मृगशीर्ष नक्षत्रादिवशी चंद्रोदयाच्या समयी ब्राह्मणास लवण (मीठ )दान दिल्यास सौभाग्य आणि सौंदर्याची प्राप्ती होते.
४) महेश्वराष्टमी व्रत: या व्रतामध्ये मार्गशीर्ष शुद्ध अष्टमीला कमळावर ठेवलेल्या शिवाच्या मूर्तीला किंवा शिवलिंगाला तूप दूध यांनी स्नान घालून त्याची मनोभावे पूजा करावी.या व्रताने अश्वमेघ यज्ञ केल्याएवढे पुण्य मिळते तसेच मृत्यूपश्चात शिवलोकाची प्राप्ती होते अशी धारणा आहे.
५) शिवचतुर्दशी माहेश्वरी व्रत : या व्रताचे माहात्म्य नारद पुराणात सांगितले आहे. यात मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीपासून एक वेळ जेवण घेऊन उमा महेशाचे पूजन करतात.१ ते १२ वर्षे हे व्रत करतात.प्रत्येक महिन्यात एक पंचगव्य (दूध ,दही, ताक, तूप , गोमूत्र )यातील एक वस्तू भक्षण करून उपवास सोडतात. या व्रतात झोपण्याची साधने दान करतात.(पलंग , चादर, उशी वगरे). या व्रतामुळे सहस्त्र अश्वमेघ यज्ञ केल्याएवढे पुण्य मिळते.
६) धन्य व्रत : मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला उपवास करून रात्री अग्निपूजा करतात.त्यात विष्णू सहस्रनामासह होम करतात. उद्यापनाच्या वेळी लाल वस्त्र तसेच लाल फुले घेऊन विष्णू पू दान करतात.या व्रतामुळे सुख समृद्धी प्राप्त होते.
७)नामद्वादशी : मार्गशीर्ष शुद्ध द्वादशीस नाम द्वादशी म्हणतात. या दिवशी विष्णूची पूजा करून दानधर्म करतात या व्रतात वस्त्र , चप्पल, दान करतात.
८) कामिका व्रत : मार्गशीर्ष वाद्य द्वितीय या दिवशी उपवास करून ब्राह्मणाला आपल्या ऐपतीप्रमाणे श्रीविष्णूची सोन्याची /चांदीची आठवा पंचधातूची मूर्ती दान करावी . असे केल्याने श्रीप्राप्ती होते.
९)वैतरणी व्रत : हे व्रत मार्गशीर्ष एकादशीस सुरु करतात. गाय ही या व्रताची देवता असते. संकल्पपूर्वक गायीची पूजा करावी. गाय शक्यतो कपिल -काळी असावी. तिला स्नान घालून गंध फुले वाहून चारा-गवत द्यावे.हे व्रत पाच वर्ष करतात. व्रताचे उद्यापन करताना संसारोपयोगी वस्तू दान द्याव्या.हे व्रत केल्याने पापाचा नाश होतो.
१०) गोदान धर्मव्रत : हे व्रत मार्गशीर्ष शुद्ध दशमीस करतात.या दिवशी उपवास करून होम करतात. गाय दान केल्याने दीर्घायुष्य व कीर्ती प्राप्त होते.
११) प्रावरण षष्ठी व्रत : मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला हे व्रत करतात. या व्रतात दानाचे महत्व आहे. देवाला म्हणजेच एखाद्या मंदिरात तसेच ब्राह्मणांना थंडीच्या निवारणासाठी लोकरीच्या वस्त्राचे दान करतात.
या महिन्यात दत्तजयंती हा उत्सव असतो. दत्तजयंती काही ठिकाणी चतुर्दशी किंवा पौर्णिमेला साजरी करतात. प्रथेप्रमाणे हा उत्सव करावा. या उत्सवात दत्तजयंतीच्या आधी सात दिवस गुरूचरित्राचे पारायण करतात.