माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्या सांगोला दौरा
भाई गणपतराव देशमुखांच्या कुटुंबियांचे करणार सांत्वन
सांगोला (विशेष प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मंगळवार, १७ ऑगस्ट रोजी सांगोला दौ-यावर येत आहेत. शेकापचे ज्येष्ठ नेते कै. गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबियांचे ते सांत्वन करणार आहेत. फडणवीस यांचा शासकीय दौरा प्राप्त झाला आहे.
माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे मंगळवार, १७/८/२०२१ रोजी दुपारी दीड वाजता कै. भाई गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानी भेट देतील. त्यांचा सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे.
ना. देवेंद्र फडणवीस हे सकाळी सव्वा सात वाजता माेटारीने नागपूरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येतील. सकाळी ८ वाजता ते इंडिगो विमानाने पुण्याकडे प्रयाण करतील. सकाळी ९.२० वाजता पुणे येथे विमानाने त्यांचे आगमन होईल. सकाळी ९.३० वाजता मोटारीने ते सांगोल्याकडे प्रयाण करतील. दुपारी दीडच्या सुमारास ते कै. गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानी पोहोचतील. देशमुख कुटुंबियांचे सांत्वन करतील.
वेळेनुसार ते कारने बार्शीकडे निघतील. सायंकाळी साडेचार वाजता आमदार राजेंद्र राऊत यांच्या बार्शी येथील निवासस्थानी पोहोचतील. रात्री मोटारीने मुंबईकडे निघतील. त्यांना वाय प्लस एस्कॉर्टसह सुरक्षा व्यवस्था आहे.
हेही वाचा
“चिंच विसावा” कृषी पर्यटन केंद्र बनलंय पर्यटकांचं आकर्षण
कोव्हिशिल्डचा तिसरा बूस्टर डोसही आवश्यकच : डॉ. सायरस पुनावाला
खा. शरद पवार सांगोल्यात; गणपतराव देशमुखांच्या कुटुंबियांचे सांत्वन करताना झाले भावूक
गणपतराव देशमुखांच्या स्मरणार्थ डिकसळमध्ये साकारणार ‘भाईंची देवराई’; १० ऑगस्ट रोजी शुभारंभ