माचणूरला जाणारी भरधाव कार जळून खाक
कामती बु. (ता.मोहोळ) येथील घटना
कामती : श्रावणातील पहिल्या सोमवार निमित्त माचनूर येथील सिद्धेश्वर मंदिराच्या दर्शनाला निघालेल्या भक्ताच्या कारला अचानक आग लागल्याने कार जळून खाक झाली आहे. ही घटना मोहोळ तालुक्यातील कामती बुद्रुक येथे आज सकाळ दहाच्या सुमारास घडली.
शेळगी, सोलपूर येथील सिद्धराम कोळी हे कुटुंब आपल्या कुटुंबासह एमएच ४५ ए २४६८ या आल्टो कारने माचनूर येथील सिद्धेश्वर मंदिरच्या दर्शनाला निघाले होते.त्यांच्या कारला वाहनाच्या आतील इंजिन मध्ये अचानक बिघाड झालाल्याने वाहनाने पेट घेतला.यात जीवितहानी झाली नाही.
कामती पोलीस ठाण्याचे पोहेकॉ परमेश्वर जाधव,हायवेचे पोलीस जगन इंगळे,सुनील पवार, चालक सागर चव्हाण,राहुल दोरकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली.आग विझवण्यासाठी डीबील कंपनीचे टँकर वापरण्यात आला.स्थानिक नागरिकांनी मदत केली.
आगीचा भडका मोठा झाल्याने कार जाग्यावरच जळाली आहे.या वाहनात कोळी यांच्या कुटुंबातील तीन महिला एक लहान मुलगा असे पाच जण प्रवास करत होते.यात कुणालाही इजा झाली नाही.कामती पोलीस ठाणे पुढील तपास करीत आहे.