महेश मांजरेकर कलाकारांची माफी मागा
सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बँड, बँजो कलाकारांची निर्दशने
![](https://thinktanklive.in/wp-content/uploads/2023/01/Capture-2023-01-19-12.07.46-780x470.jpg)
थिंक टँक / नाना हालंगडे
बँड, बँजो कलाकार हे अनंत अडचणींचा सामना करीत आपली कला जिवंत ठेवत आहेत. या कलाकारांची समाजासोबत नाळ जोडलेली आहे. कोणतेही शुभकार्य, मिरवणुकांमध्ये हे कलाकार आपली सेवा देत असतात. कोणतेही कारण नसताना महेश मांजरेकर यांनी या कलाकारांचा घोर अपमान केला आहे. हा अधिकार तुम्हाला कोणी दिला. मांजरेकर यांच्या या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे कलाकार पेटून उठले आहेत. मांजरेकर यांनी कलाकारांची बिनशर्त माफी मागावी. अन्यथा या आंदोलनाला उग्र रूप देवू असा खणखणीत इशारा देत बँड, बँजो कलाकारांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शने केली.
बुधवार दिनांक 18 जानेवारी रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सांगली जिल्ह्यातील बँड, बँजो चालक-कलाकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुणकुमार तेरदाळे यांच्या नेतृत्वाखाली सिने अभिनेता महेश मांजरेकरच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
नुकत्याच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वेब सिरीजमधील मांजरेकरच्या वादग्रस्त विधानामुळे संपूर्ण बँड, बँजो कलाकारांच्या विश्वात नाराजी मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे.
महेश मांजरेकर यांच्या बद्दलच्या नाराजीच्या उद्रेकाचे रूपांतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामधील कलाकार हडबडून जागा होऊन जो तो कलाकार मांजरेकराच्या विरोधात निदर्शने करू लागला आहे.
त्यानुसार सांगली येथे सांगली जिल्हाध्यक्ष अरुणकुमार तेरदाळे यांच्या नेतृत्वाखाली व महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष सुभाषराव जाधव, महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव जयसिंगराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सांगली, पलूस, किल्ले मच्छिंद्रगड, कडेगाव , मालेगाव, इचलकरंजी, मिरज, कवलापूर, जवळे, कवठेमहांकाळ, वाकुर्डेसह इतर गावातून मोठ्याप्रमाणात बँड मालक व कलाकार निदर्शने करण्यासाठी उपस्थित होते.
सदर आंदोलनामध्ये सांगली जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, कलाकारांबाबत महेश मांजरेकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील बँन्ड कलाकार कमालीचा नाराज झालेला आहे. आम्ही कलाकार मंडळी स्वाभिमानी बाण्याचे आहोत. आम्ही “कुणाच्या ध्यात ना मध्यात”. आम्हाला आमचे काम भले आणि आम्ही, घेतलेल्या ऑर्डरप्रमाणे काम (वाजविणे ) करणे ही आमची सामाजिक बांधिलकी आहे. असे असताना मांजरेकरला आमच्या कलाकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा व बेताल वक्तव्य करण्याचा अधिकार दिला कोणी ?
अशा प्रकारच्या अवमानकारक, अश्लील संवाद करून सामाजिक वातावरण दूषित करणाऱ्यांना वेळीच कठोर शासन झाले तर भविष्यात आम्हा कलाकारांकडे कोणी वाकड्या नजरेने बघणार नाही. यासाठी संघटनेच्या माध्यमातून आम्ही शासनाचे आणि समाजाचे लक्ष वेधण्यासाठी निदर्शने करून तातडीने मांजरेकरावर गुन्हा दाखल करून वेब सिरीजचे लेखक व दिग्दर्शक रामचंद्र गावकर यांचेवर योग्य ती कार्यवाही होण्याची मागणी करत आहोत. जर सदर महेश मांजरेकर व त्यांचे सहकारी यांचे वर लवकरात लवकर अटकेची कार्य कार्यवाही झाली नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन केले जाईल असे संघटनेचे राज्य प्रतिनिधी जयसिंगराव पवार यांनी मागणी केली.
यावेळी अध्यक्ष अरुणकुमार तेरदाळे, किल्ले मॅचिंद्रगचे जयसिंग पवार, उपाध्यक्ष सुभाष चव्हाण, धर्मा पवार, मालेगावचे शाम खांडेकर, इचलकरंजीचे राजू देसाई, हरिपूरचे विजय जाधव, सचिन माने, अभिषेक कारंडे, मिरजेचे रफिक भाई, कवलापूरचे सुनील गायक, श्रीकांत बबलू आणि सौ. संगीता माने गायिका, कडेगावचे संतोषकुमार माने, वाकुर्डेचे बापू, क.महांकाळचे अनिल हत्तीकर, जवळा येथील संघर्ष डिजिटल बँजोचे मालक सुशीलकुमार मागाडे, व्यवस्थापक बिरुदेव केंगार, अमोल आण्णा, सर्व सहकारी कलाकार, सामाजिक कार्यकर्ता शेखर कांबळे हे उपस्थित होते.
हेही वाचा
संभाजीराजे, स्वराज्य रक्षक की धर्मवीर? हिंदू धर्मातल्या औरंगजेबांची खेळी
नाटू- नाटूला पुरस्कार मिळताच राजामौलींच्या डोक्यात गेली हवा?