महाराष्ट्र संस्कृतीचे शत्रू मनोहर भिडे कसे?
डॉ.श्रीमंत कोकाटे यांचा खळबळजनक लेख
कुंकू – टिकली हे जरी सौंदर्याचे-सौभाग्याचे प्रतिक असले तरी ते कोणी लावावे कोणी लावू नये, हे ठरविण्याचा अधिकार भिडेंना कोणी दिला?. विधवांनी कुंकू लावले नाही म्हणून त्या कर्तृत्ववान नसतात असे जर भिडेचे मत असेल तर ही भिडेंची विकृती आहे. राजमाता जिजाऊमाँसाहेब, महाराणी ताराबाई, सरसेनापती उमाबाई दाभाडे, लोकमाता अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, राणी चेन्नमा इत्यादी महामातांनी वैध्यव्याने हतबल न होता हिमतीने कार्य केलेले आहे. कुंकू न लावणाऱ्या महिलांबदल अपशब्द वापरणाऱ्या भिडेंनी हा इतिहास एकदा वाचावा. भारतीय संस्कृतीत अनेक समाजात कुंकू लावण्याची पद्धत नाही, म्हणून ते कर्तृत्ववान किंवा गुणवान नसतात, असे नसते. हे भिडेंनी समजून घ्यावे.
आजच्या काळातील मराठयांचा खरा शत्रू मनोहर भिडे आहे. मराठा तरुणांना एससी- मुस्लिमांची भीती दाखवायची आणि त्यांच्यावर वर्चस्व प्रस्थापित करायचे हे भिडेंचे षडयंत्र आहे. मनोहर भिडे हे मराठा तरुणांना मुस्लिम आणि एससीच्या विरुद्ध भडकावत असतात. मराठा तरुणांना छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजांचा चुकीचा इतिहास सांगून त्यांची मानसिकता मुस्लिमाविरुद्ध बनविण्याचे काम भिडेंनी केलेले आहे. शिवाजीराजे संभाजीराजे मुस्लिमाविरुद्ध होते, म्हणजे आता मराठा तरुणांनी हातात शस्त्र घेऊन मुस्लिमाविरुद्ध दंगल केली पाहिजे, अशी भिडेंची शिकवण आहे.
मराठा तरुणांना आकर्षित करण्यासाठी भिडेंनी संभाजी हे नाव धारण केलेले आहे, अन्यथा ब्राह्मणांत अपवाद वगळता शिवाजी, संभाजी, तुकाराम, शाहू ही नांवे आढळत नाहीत. संभाजीराजे जातीयवादी नव्हते, त्यांनी शत्रूंच्या महिलांचादेखील आदर केला, त्यांनी ब्राह्मण गुन्हेगाराला देहांताची शिक्षा दिली. ते संस्कृत विद्वान होते, हा खरा इतिहास भिडे कधीही सांगत नाहीत. मुळात शिवकालीन लढाई ही राजकीय होती, ती धार्मिक नव्हती. ती धार्मिक असती तर सर्व मराठा शिवरायांसोबत आणि सर्व मुस्लिम मोगल-आदिलशहा सोबत असायला हवे होते, मराठा समाजाला एकटे पाडण्याच्या आरएसएसच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी भिडे करत आहेत.
शिवरायांचे नाव घेऊन भिडे हे मराठा तरुणांना डॉक्टर व्हा, कलेक्टर व्हा, इंजिनीअर व्हा, न्यायाधीश व्हा, प्राध्यापक व्हा, वकील व्हा असे कधीच सांगत नाहीत, तर मुस्लिम आणि एससीद्वेष शिकवून दंगली घडवतात. दंगली घडविणारे गुरुजी कसले? हे तर मराठा तरुणांना दंगली करायला शिकविणारे अतिरेकी आहेत.
मुळात मराठा समाज जातीयवादी नाही. सर्व जातिधर्माला सोबत घेऊन स्वतःच्या जातीच्या विकासाला प्राधान्य देण्यापेक्षा सर्व जातीच्या भावंडांना आधार देणे, हे मराठा नेतृत्वाचे वैशिष्ट्ये आहे. शिवाजी महाराज, संभाजीराजे, संत तुकाराम महाराज, शाहू महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, सयाजीराव गायकवाड महाराज या महामानवानी कधीही जातीभेद केला नाही. त्यांचा वारसा जपणारा मराठा समाज आहे. पण आज भिडेंच्या संघटनेत काम करणारे तरुण मुस्लिम-एससीच्या विरुद्ध अत्यन्त वाईट भाषा वापरत आहेत, हीच का भिडे गुरुजींच्या संस्काराची शाळा? भिडेंमुळे आज मराठा तरुण भरकटत आहे. मराठा ही व्यापक संकल्पना आहे ती संकुचित नाही
कोरेगाव-भीमा ही दंगल घडवून भिडेंनी मराठा समाजाचा पारंपारिक सहकारी असणाऱ्या बौद्ध समाजाला मराठा समाजापासून तोडण्याचा डाव केलेला आहे. शिवकाळात सर्व समाज खांद्याला खांदा लावून स्वराज्यासाठी लढला त्यांना एकमेकांच्या विरोधात उभे करण्यात भिडे आज यशस्वी झाले आहेत. यातून सर्वाधिक नुकसान मराठा समाजाचे झालेले आहे.
भिडे हे मराठा तरुणांना मुस्लिम आणि एससी बाबत खाजगीत काय सांगतात, हे या ठिकाणी लिहिणे हे सुसंस्कृतपणा धरून राहणार नाही. ते खाजगीत काय सांगतात हे समजण्यासाठी पूर्वीचे धारकरी इंद्रजित सावंत यांनी लिहिलेले “शिवप्रतिष्ठान ते शिवराज्य मंच” हे पुस्तक वाचा. ते सतत गरळ ओकत असतात. दंगली घडवून मराठा तरुणांचे करिअर बरबाद करणे, व समाजाचे ध्रुवीकरण करणे, हा भिडेंचा अजेंटा आहे.
समजा दंगल झाली तर दंगलीत मराठा,मुस्लिम,एससी मुले बळी जातात. दंगलीत भिडेंच्या जातीचे तरुण नसतात, तर मराठा तरुणच बळी जातात उदा.राहुल फटांगडे. दंगली घडवून मराठा तरुण मारणे आणि जातिजातीत टोकाचा वैरभाव निर्माण करणे, हा भिडे गुरुजींचा अभ्यासक्रम आहे.
भिडे हे सदाशिव पेठेत जाऊन मुस्लिमद्वेष पेरत नाहीत, अपवाद वगळता त्यांच्या संघटनेत जोशी, कुलकर्णी, फडणवीस, बापट, अभ्यंकर, पटवर्धन, देशपांडे, केळकर इत्यादी आडनावाचे तरुण नाहीत. मराठा तरुणांना धर्माच्या नावाखाली जखडून ठेवायचे आणि स्वताच्या जातीच्या तरुणांना शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेत चरायला मोकळे रान सोडायचे, हेच का भिडे गुरुजींचे हिंदुत्व आहे?
भिडे हे ऐन परीक्षेच्या काळात गडमोहीम काढून मराठा तरुणांना ज्ञानाच्या क्षेत्रापासून दूर घेऊन जात आहेत. मराठा तरुणांना जोधा-अकबर चित्रपटाला विरोध करायला लावणारे भिडेनी “मैने प्यार किया” चित्रपटात सलमान खान बरोबर काम करणाऱ्या सांगलीच्या भाग्यश्री पटवर्धनच्या विरोधात मोर्चा का काढला नाही? मराठा तरुणांना मुस्लिमद्वेष शिकविणाऱ्या भिडेंनी खानांबरोबर चित्रपटात काम करणाऱ्या माधुरी दीक्षित,ऐश्वर्या रॉय,उर्मिला मातोडकर यांच्याविरुद्ध मोर्चा का काढला नाही? याचा मराठा तरुणांनी विचार करावा.
जिजाऊंच्या बदनामी कटातील भांडारकर संस्थेवर भिडेंनी मोर्चा का काढला नाही? जिजाऊंची बदनामी करणाऱ्या पुरंदरेंच्या विरोधात भिडेंनी मोर्चा का काढला नाही? बनावट गुरु कोंडदेवचा जिजाऊशेजारील पुतळा काढण्यासाठी भिडेंनी मोर्चा का काढला नाही? शिवरायांची बदनामी करणाऱ्या पुरंदरेंच्या पुरस्काराला भिडेंनी विरोध का केला नाही? शंभूराजांची बदनामी करणाऱ्या गडकरीचा पुतळा संभाजी उद्यानातून काढावा, यासाठी भिडेंनी आंदोलन का केले नाही? या महत्वपूर्ण बाबींचा मराठा तरुणांनी न चिडता शांतपणे विचार करावा, ही विनंती.
ज्या भागात शाहू महाराजानी विधायक काम करून सर्व समाजाचे ऐक्य घडविले होते, त्याच भागात शाहुराजांच्या कार्याचा सूड उगविण्याचे काम भिडेंनी जातिजातीत भांडण लावून केलेले आहे. भिडे हे मराठा तरुणाच्या भाकरी, शेती, शिक्षण, पाणी, नोकरी, आरक्षण या प्रश्नावर कधीही बोलत नाहीत, तर हिंदू -मुस्लिम या संघर्षावर त्यांचा भर असतो, म्हणजे मराठा तरुणांना मुस्लिम- दलितांची भीती दाखवायची आणि दंगली घडवायच्या, यासाठी चुकीचा इतिहास सांगायचा, हे भिडेंचे जीवितकार्य आहे.
चुकीचा इतिहास सांगायचा आणि मराठा तरुणांची माथी भडकवायची, हा माझा जन्मसिद्ध हक्कच आहे, या अविर्भावात भिडे हे राज्यभर भ्रमंती करत असतात. सर्वपक्षीय मराठा नेत्यांना विनंती आहे की मराठा तरुणांना बरबाद करणारे हे भिडेविष पोसून समाज बरबाद करू नका. अपवाद वगळता सर्वपक्षीयांनी भिडेंना मदत केलेली आहे. रात्रंदिन फुले शाहू आंबेडकरांचे नाव घेणाऱ्या तथाकथित पुरोगामी पक्षाचे नेते भिडेंचे कार्यकर्ते आहेत. भिडे त्यांच्या आश्रयाला असतात. महा विकास आघाडी सरकारच्या काळातच भिडेंचे नावं आरोप पत्रातून कसे काय वगळले?
भिडेंनी पद्धतशीरपणे मुस्लिमद्वेष पेरून मराठ्यांपासून मुस्लिम तोडण्याचा प्रयत्न केला,एससीद्वेष पेरून एससी दूर केला,अनेक दंगली घडवून अनेक मराठा तरुणांचे आयुष्य बरबाद केले.आज मराठा एकटा पाडण्याचे काम भिडे आणि त्यांच्या परिवाराने केले आहे. बहुजन समाजात उभी आडवी फूट पाडण्याचे काम भिडेंनी केलेले आहे. मराठा तरुणांना नम्र विनंती आहे की भिडेंची संगत सोडून अभ्यास करा, शिक्षण घ्या, खरे खोटे समजून घ्या, उद्योग व्यवसाय करा, स्पर्धा परीक्षा देऊन डॉक्टर, वकिल, इंजिनीअर, कलेक्टर व्हा, प्राध्यापक व्हा, न्यायाधीश व्हा.
शिवकाळात ढाल-तलवारीची लढाई होती, ती त्याकाळाची गरज होती,आता ढाल-तलवारीची लढाई कालबाह्य झालेली आहे. आजची लढाई ज्ञानाची लढाई आहे. जे जे शस्त्राची भाषा बोलतात ते ते लोकशाहीचे आणि मानवतेचे शत्रू आहेत, मग त्यात तालिबानी, नक्षलवादी आणि भिडे सारखेच आहेत. हे सर्वजण मानवी बॉम्ब तयार करत आहेत,या अतिरेक्यापासून सर्व समाजातील तरुणांनी दूर राहावे, ही विनंती! पालकांनी आपली मुलं कोणत्या दहशतवादी संघटनेत जाणार नाहीत,याची खबरदारी लहानपणापासूनच घ्यायला हवी.
१.आंबे खाऊन मुले होतात
२.संतापेक्षा मनुस्मृती श्रेष्ठ आहे
३.हातात तलवारी घ्याव्या लागतील.
४.इंग्रजी शिकणे मूर्खपणा आहे.
५.म्लेंच्छ(संस्कृत भाषा न येणारे)मारले पाहिजेत.
६.लेंडकांनो,…काकडा लावावा लागेल.
७.शिकून माणूस गांडु होतो.(भिडे असे ब्राह्मण मुलांना सांगत नाहीत)
८…. कडून देशप्रेमाची अपेक्षा करणे म्हणजे हागणदारीत मोती शोधणे होय.
९.आरक्षण आणि शेतीमालाला हमी भाव मागणे म्हणजे देशप्रेम नव्हे.
१०.महात्मा फुले देशद्रोही होते.
११.आंबेडकर……करत होते.
१२.शाहू महाराज…होते
१३.जपान मनुस्मृतीनुसार चालतो.
१४.डॉ बाबासाहेब आंबेडकर मनुस्मृतीचे समर्थक होते.
१५. कुंकू लावणाऱ्या पत्रकार महिलांशीच बोलणार.
१६.इत्यादी.
असे विष पेरून भिडे तरुणांची डोकी खराब करत आहेत. तात्काळ अटक करावी, इतकी भिडेंची गुन्हेगारी प्रवृत्ती आहे. असे बरळणाऱ्या व्यक्तीने केलेला त्याग, घेतलेले कष्ट, उचललेली मेहनत कुणासाठी कामाला आली? कुणाच नुकसान करत अाहे? हे आता सुर्यप्रकाशाइतके स्पष्ट झाले आहे. स्वत:लाच विचारा, आपलेच नुकसान करणाऱ्यावर किती दिवस विश्वास ठेवणार आहात?
– डॉ. श्रीमंत कोकाटे
पुढील दोन महिन्यात जगावर भीषण संकट! बाबा वेंगा यांचे धडकी भरवणारे भाकीत | Think Tank Live