मराठी रंगभूमी दिनानिमित्त ‘युगान्त’ नाटकाचे अभिवाचन
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या ललितकला व कला संकुलाचा उपक्रम
सोलापूर (विशेष प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या ललितकला व कला संकुलातर्फे मराठी रंगभूमी दिनानिमित्त महेश एलकुंचवार लिखित ‘युगान्त’ या नाटकाच्या अॉनलाईन अभिवाचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ललितकला व कला संकुलाच्या संचालक प्रा.डॉ. माया ज. पाटील यांनी दिली.
हा कार्यक्रम गुरुवार, ५ रोजी सायंकाळी सहा वाजता ऑनलाईन स्वरुपात होईल.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस असतील. विद्यापीठाचे प्र-कुलगुरु प्रा.डॉ. देवेंद्रनाथ मिश्रा, कुलसचिव प्रा.डॉ. विकास घुटे, वित्त व लेखाधिकारी प्रा.डॉ. श्रेणिक शाह यांची प्रमुख उपस्थिती असेल.
आकाश बनसोडे, महेश क्षीरसागर, किरण जगदाळे, पल्लवी दशरथ हे विद्यार्थी नाटकाचे अभिवाचन करतील. या कार्यक्रमासाठी प्रा.डॉ. गणेश शिंदे व प्रा. अमोल देशमुख यांचे नाट्य मार्गदर्शन लाभले आहे.
मराठी रंगभूमीला मोठी एेतिहासिक परंपरा आहे. ही परंपरा उजागर करणारी अनेक नाटके लोकजागर करताना दिसत आहेत. यापैकीच महेश एलकुंचवार लिखित ‘युगान्त’ हे नाटक आहे. कोरोना महामारीच्या काळातही मराठी नाट्यरसिक व अभ्यासकांसाठी हा कार्यक्रम मेजवानी असणार आहे.
– प्रा.डॉ. माया ज. पाटील (संचालक-ललितकला व कला संकुल)
ऑनलाईन कार्यक्रमाची लिंक https://youtu.be/cfP8uYRFCoQ