भिडे गुरुजींचं ट्विट.. “..तर श्रद्धा आज “टिकली” असती”
थिंक टँक न्यूज नेटवर्क
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांनी बहुचर्चित श्रद्धा पालकर खून प्रकरणावर महत्त्वपूर्ण ट्विट केले आहे. “टिकलीवर “श्रद्धा” असती, तर श्रद्धा आज “टिकली” असती” असे सांगतानाच त्यांनी या ट्विटमधून टिकली विषयाला पुन्हा हवा दिली आहे.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी हे नेहमी चर्चेत असलेले व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या स्पष्ट आणि आक्रमक भूमिकेमुळे ते नेमही चर्चेत असतात. जहाल हिंदुत्ववादी भूमिकेमुळे अनेकदा मोठे वाद झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी इन्फोसिस कंपनीच्या प्रमुख तथा सुप्रसिध्द लेखिका सुधा मूर्ती यांची भेट घेतली होती. त्यावरूनही मोठे वादंग माजले. एका पत्रकार महिलेला ” तू आधी टिकली लाव मग मी तुझ्याशी बोलतो” असे म्हणत नव्या वादाला तोंड फोडले होते.
कटुसत्य ! pic.twitter.com/hwZYJbkVJ3
— Sambhajirao Bhide Guruji (@bhidegurujii) November 15, 2022
मर्डर प्रकरणावर केले ट्विट
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांनी काही वेळापूर्वी श्रद्धा आणि आफताब यांच्या प्रकरणावर गंभीर भाष्य केले आहे. “टिकलीवर “श्रद्धा” असती, तर श्रद्धा आज “टिकली” असती” असे सांगतानाच त्यांनी या ट्विटमधून टिकली विषयाला पुन्हा हवा दिली आहे.
त्यापूर्वीच्या ट्विटमध्ये ते म्हणतात की, “हिंदू मुलींना धर्मशिक्षण देणं नितांत गरजेचे आहे दररोज एक “श्रद्धा” जिहादला बळी पडत आहे ! बाकी इतर वेळेस महिलांच्यासाठी लढण्याचे सोंग करणारे तथाकथित विचारवंत, गुन्हेगार असणाऱ्या आफताबचा धर्म पाहून तोंड बंद करून बसले आहेत.
हिंदूंनी अशा खोट्या विचारवंतांचा खरा चेहरा लक्षात घ्यावा.”
“आफताब आणि अब्दूलच्या प्रेमात पडल्यावर त्याचा शेवट कसा होतो हे सर्व पालकांनी आपल्या मुलींना जरूर सांगा !
अशाप्रकारे जागृती केल्याशिवाय लव्ह जिहादला आळा बसणार नाही.”
त्यांच्या या ट्विटवर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत. हर्षल लोहकरे म्हणतात की, “टिकली असो वा नसो, वा असो कुंकू, भिडे गुरूजींनी खरे तर किमान हिंदू धर्मातील विधवा, परित्यक्ता, सासरी न नांदणार्या माता भगिनींचे प्रश्न हाती घेतले पाहिजेत. एवढ्या विशाल आणि व्यापक हिंदू धर्माला ग्लानी आणण्याचे काम काही हिंदू पतींकडून व पुरूषांकडून व स्त्रियांकडून केले जात आहे. हे काही बरोबर नाही. श्रद्धाला न्याय मिळवून देण्याची मागणी करत असताना भिडे गुरूजींनी या गंभीर व संख्येने मोठ्या संवेदनशील प्रश्नाकडेही लक्ष दिले पाहिजे. भिडे गुरूजींनी हे केलं पाहिजे.”
हेही पाहा
दिल के टुकडे 35, मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये, मुंडके पाहत “तो” झोपायचा