गुन्हेगारीताजे अपडेटथिंक टँक स्पेशलराजकारणरोजगार/शिक्षणशेतीवाडी

भयानक! जत तालुक्यात चौघा साधूंना बेदम ठोकले

मुले पळवणारी चोरांची टोळी समजून केले कृत्य

Spread the love

थिंक टँक / नाना हालंगडे
गावातील मुले पळवणारी चोरांची टोळी असल्याचे समजून चौघा साधूंना बेदम मारहाण केलाची धक्कादायक घटना जत तालुक्यातल्या लवंगा या ठिकाणी घडली आहे. यावेळी आम्ही साधू आहोत, विजापूरला निघालोय असे सांगत असताना जमावाने न ऐकत मारहाण केली. या घटनेत मारहाणीत साधू गंभीर जखमी झाले आहेत.

लम्पीचे संकट; एक मिलिच्या डोसचीच टोचणी करावी : डॉ. सय्यद

लवंगा या ठिकाणी आलेल्या चौघा साधूंना चोर समजून ग्रामस्थांनी ही मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. सुदैवाने पालघर सारखी घटना होता-होता टळली आहे. या घटनेची नोंद उमदी पोलिस ठाण्यामध्ये झाली आहे.

सांगोला तालुक्यात जनावरे वाहतुकीवर बंदी : तहसीलदार

याबाबत सविस्तर माहिती अशी की, उत्तर प्रदेश मधील मथुरा येथील चौघे साधू हे कर्नाटकला देवदर्शनासाठी आले होते. त्यानंतर ते विजापूरहुन जत तालुक्यातल्या लवंगा मार्गे पंढरपूर या ठिकाणी देवदर्शनासाठी निघाले होते.उत्तर प्रदेश येथील वाराणसी येथून चार साधू कर्नाटक येथे देवदर्शनासाठी गेले होते .कर्नाटक येथील देवदर्शन आटपून ते लवंगा मार्गे विजापूर येथे जात होते. दरम्यान रस्त्यात गाडी थांबवून विजापूर हा रस्ता कोणता आहे. याबाबतची विचारणा एका विद्यार्थीस केली असता पोरे चोरणारी टोळी समजून चारही साधूंना गाडीतून ओढून काठीने ,पट्ट्याने मारहाण केली.

यावेळी लवंगा या चौघा साधूंनी रात्रीच्या सुमारास गावातल्या एका मंदिरामध्ये मुक्काम केला होता. त्यानंतर सकाळी हे चौघेही साधू गाडीतून निघाले असता, एका मुलाला त्यांनी रस्ता विचारला, त्यातून काही ग्रामस्थांना ही मुले चोरणारी टोळी असल्याचा संशय आला. यानंतर ग्रामस्थांनी या साधूंकडे चौकशी करायला सुरुवात केल्यानंतर साधू आणि ग्रामस्थांच्या मध्ये वादावादीचा प्रकार घडला. यातून संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी साधूंना गाडीतून बाहेर काढून बेदम मारहाण केली. त्यांना लाठी-काठी आणि पट्टयाने जबर मारहाण करण्यात आली.

या घटनेची माहिती मिळताच उमदी पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली होती. त्यानंतर या साधूंकडे चौकशी केली असता,या साधूंच्याकडे मिळालेले आधार कार्ड आणि त्यानंतर संबंधित उत्तर प्रदेश मधील त्यांच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता, हे सर्व मथुरा येथील श्री पंचनामा जुना आखडयाचे साधू असल्याचं समोर आलं आणि खरे साधू असल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर या साधुनी मोठ्या मनाने ग्रामस्थांच्या विरोधात कोणतेही तक्रार नसून गैरसमजुरीतून हा प्रकार घडल्याचं पोलिसांना सांगितले. त्यामुळे या प्रकरणी कोणाची ही तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली नाही,अशी माहिती उमदी पोलीस ठाण्याचे अधिकारी पंकज पवार यांनी दिली. तर चौकशीनंतर साधूंनी पंढरपूरकडे देवदर्शनासाठी प्रस्थान केले. मात्र या सर्व मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तर काही वर्षांपूर्वी पालघर या ठिकाणी साधूंना, अशाच प्रकारे चोर समजून मारहाण केल्याने खुनाचा प्रकार घडला होता, तशीच पुनरावृत्ती सुदैवाने लवंगा येथे होता-होता टळली.

यावेळी साधूंना आपले ओळखपत्र, आधार कार्ड याबाबतची सविस्तर माहिती जमावाला देऊन ही जमावाने न ऐकले नाही. यामध्ये वाराणसी येथील महालिंगेश्वर मंडल हे प्रसिद्ध साधूचा यात समावेश आहे. पोलिसांनी सर्व साधूची ओळखपत्रावरून खातरजमा केली.

पाहा खास व्हिडिओ

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका