ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलमाध्यमविश्वविज्ञान/तंत्रज्ञानशेतीवाडी
Trending

बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा महाविजेता ठरला अक्षय केळकर

Spread the love

थिंक टँक / नाना हालंगडे
अक्षय केळकर (Akshay Kelkar) हा ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi 4) चौथ्या पर्वाचा महाविजेता ठरला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते. आज झालेल्या महा महाअंतिम स्पर्धेत त्याने बाजी मारली. त्याचा 16 स्पर्धक आणि 100 दिवसांचा प्रवास संपला आहे. किरण माने आणि राखी सावंतने या स्पर्धेत चांगलीच धमाल केली होती.

अपूर्वा आणि अक्षय केळकर (Akshay Kelkar) हे दोन स्पर्धक शेवटच्या टप्प्यात होते. यात अक्षय केळकरने बाजी मारली आहे. अक्षयला 15 लाख 55 हजार रुपयांचं बक्षीस आणि ट्रॉफी देण्यात आली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते अभिनंदनाच्या शुभेच्छा देत लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. खेळाडूवृत्ती, स्पष्टवक्तेपणा, घरातील वावर, टास्क जिंकण्याची जिद्द यामुळे तो कायम चर्चेत राहिला.

राखी सावंतही स्पर्धेत
बिग बॉस मराठी’च्या यंदाच्या पर्वात अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar), अक्षय केळकर (Akshay Kelkar), अमृता धोंगडे (Amruta Dhongade), किरण माने (Kiran Mane) आणि राखी सावंत (Rakhi Sawant) हे सदस्य ‘टॉप 5’ (Top 5) मध्ये पोहोचले होते. त्यामुळे या पाच जणांमधून कोण महाविजेता किंवा महाविजेती होणार याची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता होती. अखेर अक्षय केळकर विजेता ठरला आहे.

अमृताच्या रडण्याने हलवून सोडलं
घराला घरपण देणारी माणसं (Bigg Boss Marathi 4 Grand Finale) ‘बिग बॉस मराठी’च्या घराला यावर्षी कधी अपूर्वाच्या आवाजाने तर कधी अमृताच्या रडण्याने हलवून सोडलं. कधी अक्षयची स्ट्रॅटेजी तर कधी राखीचे राडे आणि फुल ऑन एंटरटेनमेंट ने हे घर सतत चर्चेत राहिले. कधी हे घर विकास आणि अपूर्वाच्या लुटुपुटुच्या भांडणांचे साक्षिदार राहिले तर कधी घरात घडलेल्या प्रत्येक लहान मोठ्या घटनांचे. कधी सदस्यांसोबत हे घर खूप हसलं तर कधी त्याला देखील अश्रू अनावर झाले. या घराने सदस्याचे प्रत्येक रूप पहिले. मायाळू, खोडकर, भांडखोर, संवदेनशील, कारस्थानी… या भिंती आणि या घरातील प्रत्येक वस्तू याचे साक्षिदार असतील.

कोण आहे अक्षय केळकर ?
बिग बॉस मराठीच्या घरातील एक मास्टर माइंड चेहरा म्हणजे अक्षय केळकर. अक्षय केळकर हा मालिका जगतात गाजलेला कलाकार. बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री घेतल्या पासूनच त्याने स्वतःचं वेगळेपण दाखवलं. त्याने वाद घातले, राडे केले पण त्याहीवेळी त्याने स्वतःची बाजू उत्तम पद्धतीने राखली. त्याच्या या यशाबद्दल त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.

विजेतेपदावर नाव कोरल्यानंतर अक्षयने एक खास पोस्ट लिहिली आहे. चाहत्यांचे आभार मानत त्याने लिहिलं आहे,”हे फक्त आणि फक्त तुम्हा प्रेक्षकांमुळे होऊ शकलय! खूप खूप खूप धन्यवाद आणि मनापासून आभार! मी खऱ्या अर्थाने तुमचाच झालोय!”. अक्षयच्या पोस्टवर सेलिब्रिटींसह चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

‘दोन कटिंग’ फेम अक्षय केळकर

अक्षयची ‘दोन कटिंग’ ही शॉर्ट फिल्म एका वेगळ्या विषयावर भाष्य करणारी आहे. कमेकांशी लग्न करायला तयार नसलेलं एक जोडपं चहाच्या निमित्ताने एकत्र भेटतं आणि त्यांच्यामध्ये विचारांची देवाण-घेवाण होते आणि त्यानंतर ते एकमेकांसाठी किती पूरक आहेत याची जाणीव त्यांना होते म्हणून त्या दोघांच्या नात्यातला तो कटींग चहा त्यांना जवळ आणण्यासाठी पूल ठरतो अशी या शॉर्टफिल्मची कथा आहे. पहिल्या भागाला मिळालेल्या प्रतिसादामुळे या शॉर्ट फिल्मचा दुसरा भाग लवकरच रिलीज होणार आहे. तसेच अक्षयचे अनेक प्रोजेक्ट सध्या पाईपलाईनमध्ये आहेत.

छोट्या पडद्यावरील बिग बॉस मराठी हा कार्यक्रम कायमच चर्चेत असतो. सध्या अभिनेता अक्षय केळकर हा बिग बॉसमुळे प्रसिद्धीझोतात आला आहे. मराठी टीव्ही मालिकांमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून त्याची ओळख आहे. गेल्या काही दिवसांपासून अक्षय केळकरच्या लव्ह लाइफबद्दल अनेक चर्चा सुरु आहेत. नुकतंच अक्षय केळकरच्या गर्लफ्रेंडबद्दलचा खुलासा झाला आहे.

बिग बॉस मराठी या कार्यक्रमात नुकतंच अभिनेता जितेंद्र जोशीने एंट्री घेतली होती. गोदावरी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जितेंद्र जोशी बिग बॉसच्या घरात गेला होता. त्यावेळी त्याने घरातील सदस्यांना त्यांच्या जवळच्या व्यक्तीचे पत्र वाचून दाखवले. यावेळी त्याने अक्षय केळकरला त्याच्या गर्लफ्रेंडचे पत्र वाचून दाखवले.

बीग बॉसच्या घरातील आपली वागणूक, प्रेम, भांडण, चर्चा, वाद, शिव्याशाप, आरोप प्रत्यारोप करत स्पर्धक एकमेकांना कुरघोडी करत बाजी मारत होते. सर्वांनीच आपआपली फॅन फॉलोईंग कमावली व प्रेक्षकांचे प्रेम व सहाय्य मिळवत या ठिकाणी अंतिम टप्प्यापर्यंत मजल मारली. शेवटच्या टप्प्यात अखेरच्या पाच स्पर्धकातून अक्षय केळकरने बाजी मारत बीग बॉसच्या घरातली १५ लाख ५५ हजारांची रक्कम पटाकवली.

गेल्या शंभर दिवसांपासून चालेली चढओढ, कूरघोडी, इर्षा, स्पर्धा या सर्व खेळात अखेर मराठी बिग बॉसच्या घरातला विजेता कोण होणार याचा निकाल आज लागला. मराठी बिग बॉस सिझन ४ चा विजेता होण्याची बाजी अखेर अक्षय केळकर याने जिंकली आणि बिग बॉसचा नवा विजेता महाराष्ट्राला मिळाला. (Marathi Bigg Boss Season 4 Winner)

मागील ९९ दिवसांतील स्पर्धेत एकूण १६ स्पर्धापैकी अभिनेता किरण माने, अमृता धोंडगे, राखी सावंत, अपूर्वा नेमळेकर आणि अक्षय केळकर या पाच अखेरच्या स्पर्धाकातून अक्षय याने बाजी मारत मागील १०० दिवसांपासून सुरु असेलेल्या चढाओढीचा अखेर केला. बिग बॉस सिजन ४ ने दरवर्षी प्रमाणे यंदा मराठी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. (Marathi Bigg Boss Season 4 Winner)


हेही वाचा

जेनेरिक औषधे इतकी स्वस्त कशी?

.. तर शेकाप तीव्र लढा उभारेल!

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका