फेसबुक-इन्स्टासाठी लागणार पैसे!
महिन्याला हजार रुपयांचा प्लॅन लॉन्च
थिंक टँक / नाना हालंगडे
मेटा अर्थात फेसबुक कंपनी दिवसेंदिवस व्यावसायिक बनत चालली आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग (Meta CEO Mark Zuckerberg ) यांनी एका पोस्टद्वारे Meta Verified लाँच केले असल्याची माहिती दिली आहे. त्यानुसार आता फेसबुक वापरकर्त्यांना दरमहा सुमारे 1,000 रुपये शुल्क द्यावे लागेल. फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी हे शुल्क आकारण्यात येणार आहे. Paid subscription for blue tick
ट्विटरच्या पावलावर पाऊल
आतापर्यंत फेसबुक-इन्स्टाग्राम किंवा ट्विटरवर केवळ प्रसिद्ध लोकांनाच ब्लू टिक दिली जात होती. ब्लू टिक हे खात्याची शुद्धता दर्शवते. ब्ल्यू टिक वापरणे हे अलीकडील काळात प्रतिष्ठेचा मुद्दा बनला आहे.
ट्विटरचा मालक मस्कने पदभार घेताच यात मोठे बदल करताना ट्विटर कंपनीचा सबस्क्रिप्शन प्लॅन घेणाऱ्यांना ब्लू टिक द्या असे सांगितले.
त्याचाच पावलावर पाऊल टाकत फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनीही फेसबुक तसेच इंस्टाग्रामवर ब्लू टिक घेण्यासाठी शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
अनेकांच्या मनात हा प्रश्न उपस्थित होत आहे की, फेसबुक किंवा इन्स्टाग्राम चालवणे आता मोफत मिळणार नाही का? सतत कोणत्या शुल्काबद्दल बोलले जात आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे यात आपण पाहुयात.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid05ZW63zfac4DVbSpxVFwKmcurFrjRSQdbyDmeTh8F7GJtRUnBsmPLBRkZCRQ42c4fl&id=4&mibextid=Nif5oz
तुम्हाला आठवत असेल की अलीकडेच ट्विटरने ब्लू सबस्क्रिप्शनची घोषणा केली होती. यासह, वापरकर्ते चार्ज घेऊन अतिरिक्त फायदे घेऊ शकतात. यामध्ये नावासमोर ब्लू टिक किंवा व्हेरिफाईड बॅज मिळणे हा सर्वात मोठा फायदा आहे. बरेच लोक याकडे स्टेटस सिम्बॉल म्हणून पाहतात. त्याचाच फायदा आता कंपन्या घेत आहेत.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये लागू
आता Meta ने देखील असाच एक प्लान जाहीर केला आहे. याच्या मदतीने युजर्स पैसे देऊन ब्लू टिक मिळवू शकतात. मात्र, यासाठी त्यांना सरकारने जारी केलेले ओळखपत्रही दाखवावे लागणार आहे. हा निर्णय सध्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये लागू करण्यात आला आहे. यासाठी कंपनी सुमारे एक हजार रुपये आकारत आहे.
बनावट अकाऊंट कळतील
यामुळे बनावट अकाऊंटशी लढण्यास मदत होईल, असे कंपनीने म्हटले आहे. पैसे भरल्यानंतर आणि ओळखपत्राची पडताळणी केल्यानंतर, वापरकर्त्याच्या नावासमोर निळ्या रंगाची टिक दिसेल. यामुळे इतरांना अस्सल खाते ओळखणे कठीण होणार नाही. येत्या काळात ते भारतातही लॉन्च केले जाईल.
व्हेरिफाईड सशुल्क सेवा
सशुल्क सेवा अद्याप भारतात आलेली नाही परंतु काही आठवड्यांत ती देशातही सुरू होऊ शकते. व्हेरिफाईड सशुल्क सेवा सुरू केल्यानंतरही, तुम्ही पूर्वीप्रमाणेच फेसबुक-इन्स्टाग्राम मोफत वापरण्यास सक्षम असाल. त्यावर निळा बॅज मिळवण्यासाठी तुम्हाला शुल्क भरावे लागेल. तुम्ही कोणतेही शुल्क भरले नाही तरीही हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी पूर्वीप्रमाणेच मोफत राहतील.
आता केवळ ब्लू टिक घेण्यासाठी शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला असला तरी पुढे जाऊन या सर्व कंपन्या आपल्या सर्व सोशल प्लॅटफॉर्मच्या वापरकर्त्यांकडून अल्प का असेना शुल्क आकारू शकतात, हे यातून स्पष्ट होत आहे. मात्र, हा निर्णय घ्यायला वेळ लागू शकतो.