प्रियांका चोप्राच्या नवऱ्याला सोलापूरी चादरीची भूरळ
निक जोनासची स्टायलिश अदाकारी
थिंक टँक डेस्क : मऊ, मुलायम, उबदार सोलापूरी चादरीची भूरळ न पडणारा विरळाच. याच सोलापूरी चादरीच्या प्रेमात सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती निक जोनास (NickJonas) पडलाय. त्याने चक्क सोलापूरच्या चाटला चादरीपासून बनविलेला शर्ट परिधान करून ते फोटोज इन्स्टाग्रामवर टाकलेत. त्याच्या या स्टायलिश अदाकारीची व सोलापूरी चादरीच्या प्रेमाची सोशल मीडियावर चर्चा झडतेय.
निक जोनासची इन्स्टाग्राम लिंक : https://www.instagram.com/p/CTkiE9JrZKE/?utm_medium=copy_link
प्रियांका चोप्राचा (Actress Priyanka Chopra) पती निक जोनास नवीन नवीन स्टाईलसाठी नेहमीच चर्चेत असतो. तो अभिनेत्री प्रियंका चोप्रासोबत लग्नानंतर अमेरिकेत राहतोय. निक आणि प्रियांका चोप्रा बॉलिवूडमधील एक बेस्ट कपल मानलं जातं. दोघेही एकमेकांसोबतचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.
कोण आहे निक जोनास
निकोलस जेरी जोनास अर्थात निक जोनास हा एक अमेरिकन गायक, गीतकार, अभिनेता आणि Pop siger आहे. निकचा जन्म १६ सप्टेंबर, १९९२ रोजी डॅलस, टेक्सास, संयुक्त राष्ट्र येथे झाला. जोनास हा सात वर्षांचा असतानाच नाटकात नाट्यगृहात काम करू लागला. त्याने २००२ मध्ये संगीत क्षेत्रात पदार्पण केले. २०१८ साली त्याचे लग्न बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रासोबत झाले.
सोलापूरी चादरीची भूरळ
मऊ, मुलायम, उबदार सोलापूरी चादरीच्या प्रेमात सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती निक जोनास (NickJonas) पडलाय. त्याने सोलापूरच्या सुप्रसिद्ध चाटला चादर फॅक्टरीत तयार झालेल्या चादरीपासून शर्ट बनवून घेतलाय. हा शर्ट त्याच्या अंगावर शोभून दिसतोय.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेले हे फोटो झूम करून पाहिल्यानंतर लक्षात येईल की त्यावर SUR म्हणजे सोलापूर आणि चाटला लिहिले आहे. सोलापूरकरांच्या दृष्टिने ही आनंदाची व अभिमानाची बाब आहे.