प्रा. सागर सुरवसे, स्नेहल पवार यांची संशोधक दत्तक योजनेसाठी निवड

थिंक टँक न्यूज नेटवर्क
अक्षर वाड्मय प्रकाशन (पुणे) आणि प्रगती टेक या संस्थांच्या वतीने सावित्री-ज्योती संशोधक दत्तक योजनेचा आरंभ करण्यात आला असून सोलापूरचे तरूण प्रा. सागर सुरवसे व स्नेहल मधुकर पवार यांची त्यासाठी निवड करण्यात आल्याची माहिती अक्षरवाड्मयचे संचालक बाळासाहेब घोंगडे यांनी दिली.
अक्षर घोंगडे यांच्या वाढदिवसानिमित्त १३ डिसेंबर २०२२ रोजी या योजनेचा प्रारंभ होत आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस आणि डॉ. सुधाकर शेलार हे या योजनेचे मार्गदर्शक आहेत.प्रा. सागर सुरवसे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात अध्यापन करतात. समीक्षक डॉ. राजशेखर शिंदे हे त्यांचे पीएच.डीचे मार्गदर्शक असून सीमावर्ती प्रदेशातील मराठी बोलींचा अभ्यास हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे.
स्नेहल पवार यांचे मार्गदर्शक डॉ. संदीप तापकीर हे असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्या महानुभाव व वारकरी संप्रदायातील संत कवयित्रींच्या काव्यातील स्त्रीजाणिवांचा चिकित्सक अभ्यास या विषयावर त्या संशोधन करीत आहेत.
निवड झालेल्या संशोधकांना कोणत्याही पुस्तक खरेदीवर २५ टक्के सूट मिळणार आहे. शिवाय अक्षर वाड्मय प्रकाशनाचे कोणतेही पुस्तक भेट मिळेल. याखेरीज निवडलेल्या दोन संशोधकांचा प्रबंध प्रकाशनयोग्य असल्याची शिफारस डॉ. राजन गवस आणि डॉ. सुधाकर शेलार यांनी केली तर तो प्रकाशित केला जाईल
अक्षर घोंगडे याच्या आठव्या वाढदिवसानिमित्त सुरू करण्यात आलेली ही योजना तो १८ वर्षांचा होईपर्यंत सुरू राहणार असून यात निवड झालेल्या संशोधकांना कोणत्याही पुस्तक खरेदीवर २५ टक्के सूट मिळणार आहे. शिवाय अक्षर वाड्मय प्रकाशनाचे कोणतेही पुस्तक भेट मिळेल. याखेरीज निवडलेल्या दोन संशोधकांचा प्रबंध प्रकाशनयोग्य असल्याची शिफारस डॉ. राजन गवस आणि डॉ. सुधाकर शेलार यांनी केली तर तो प्रकाशित केला जाईल, असे बाळासाहेब घोंगडे यांनी नमूद केले आहे.