पोलिस खात्याला कलंक, बार्शी फटाका फॅक्टरी स्फोटातील तपास अधिकाऱ्याने लाच खाल्ली
३० हजारांची लाच घेताना एपीआयसह तिघे जेरबंद

थिंक टँक / नाना हालंगडे
लाचखोरी हा पोलीस खात्याला लागलेला कलंक आहे. लाच कोणत्या प्रकरणात खावी याचेही भान कोणाला राहिले नाही. असाच एक मड्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार बार्शी येथे घडला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमधील पांगरीच्या जवळील शिराळे गावात नववर्षाच्या पहिल्या दिवशी फटाका कारखान्याला आग लागली होती. त्यामध्ये पाच महिलांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा तपास ज्या अधिकाऱ्याकडे होता तो अधिकारीच लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे.
पांगरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे, कॉन्स्टेबल सुनील बोदमवाड,कँटीन चालक हसन इस्माईल सय्यद या तिघांवर एसीबीने गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे.
स्फोटात ५ महिला झाल्या होत्या ठार
शिराळे गावात १ जानेवारी २०२३ रोजी इंडियन फायरवर्क्स या फटाका फॅक्टरीत मोठा स्फोट झाला होता. यामध्ये पाच महिला कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. याबाबत पांगरी पोलीस ठाण्यात युसूफ मणियार आणि नाना पाटेकर या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पांगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या फटाका फॅक्टरी स्फोट प्रकरणात दोन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये युसूफ मणियार हा पोलिसांच्या ताब्यात आहे. तर, मुख्य संशयित आरोपी नाना पाटेकर हा,अद्यापही फरार आहे.याचा तपास सुरू असताना पांगरी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक निरीक्षक नागनाथ खुणे हे एसीबीच्या कचाट्यात अडकले आहेत.
याचा तपास सुरू असताना पांगरी पोलीस ठाण्याच्या आवारात एसीबीने १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पांगरी पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस अधिकाऱ्यास अटक केली आहे. पांगरी पोलीस ठाण्यातील एक पोलीस कर्मचारी व बाहेरील बाजूस असलेल्या एका कँटीन चालकास अटक झाली आहे. एसीबीच्या कारवाईमुळे सोलापूर ग्रामीण पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
नाना पाटेकर गायब
नाना पाटेकरला अटक करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची पथक देखील वेगवेगळ्या शहरात शोध घेत आहेत.फटाका फॅक्टरी स्फोटाच्या जखमा ताज्या असताना पांगरी पोलीस ठाण्यात एसीबीने कारवाई करत मोठा धमाका केला आहे. सदरची कारवाई एसीबीचे उपअधीक्षक गणेश कुंभार, निरीक्षक उमाकात महाडिक, शिरीषकुमार सोनवणे, प्रमोद पकाले, श्रीराम घुगे, सलीम मुल्ला, गजानन किणगी, उडानशिव, शाम सुरवसे एसीबी सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
तक्रारदार व त्यांच्या भावाविरुध्द पांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. सदर दाखल गुन्हयात तक्रारदार व त्यांचा भाऊ या दोघांचा न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजुर केला होता.
जामीनावर सोडण्याकरीता लाच
या गुन्हयात तक्रारदार तसेच त्याच्या भावाला नॉमिनल अटक करुन जामीनावर सोडण्याकरीता गुन्हयाचे तपास अधिकारी एपीआय नागनाथ खुणे व त्यांचे दप्तरी कॉन्स्टेबल सुनील बोदमवाड यांनी तक्रारदार यांच्याकडे प्रत्येकी १५ हजार रुपये प्रमाणे एकूण ३० हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
कँटीन चालक हसन सय्यद अडकला
लाच रक्कम पोलीस स्टेशन बाहेरील कँटीन चालक हसन सय्यद यांकडे देण्यास सांगितले होते.कँटीन चालकाने बुधवारी ११ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सदर लाच रक्कम स्वीकारली. सापळा लावलेल्या एसीबीच्या टीमने ताबडतोब कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले व त्याच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
हेही वाचा