पुरातत्वशास्त्रात जिज्ञासू विद्यार्थ्यांना करिअरची संधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात प्रवेश प्रक्रिया सुरु
सोलापूर (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथील सामाजिकशास्त्रे संकुला अंतर्गत “प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र” या विभागाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून या क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणा-या विद्यार्थ्यांनी त्वरित आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन विभागप्रमुख डॉ. सौ. माया ज. पाटील यांनी केले आहे.
“प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र” या विषयामध्ये अश्मयुगापासून अभ्यास केला जातो. हा प्रागैतिहासिक (Prehistory) कालखंड होय. या कालखंडातील अश्महत्यारांचा आणि त्या युगातील शैलचित्रांचा अभ्यास केला जातो. त्यानंतर इतिहासपूर्व (Proto-History) कालखंड सुरू होतो. यामध्ये भारतातील नव्हे तर जगाच्या पाठीवरची सर्वात प्रगत अशा सिंधू संस्कृती (हरप्पन किंवा सरस्वती)च्या जीवनपध्दतीचा, तेथील कलेचा, वास्तूचा, तंत्रज्ञानाचा, समाजाचा अभ्यास केला जातो. प्राचीन कला व वास्तुकलेमध्ये (Art & Architecture) लेण्या, प्राचीन चैत्यगृहे, स्तूप, विहार, लेण्या खोदण्याची पध्दती, मंदिरे, प्राचीन चित्रकला आणि शिल्पकलेचा अभ्यास होतो. पुराभिलेखांचा अभ्यास ताम्रपट, शिलालेख, भूर्जपत्राच्या आधारे केला जातो. विविध राजवटींची नाणी, त्या त्या कालखंडातील आर्थिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती वंशावळीची माहिती येते. पुरातत्वशास्त्राच्या अभ्यासामध्ये ब-याचदा संग्रहालयशास्त्र हा विषय असतो.
वस्तुसंग्रहालयात वस्तू कशा मांडतात. त्यांचे संरक्षण कसे करावे, हे शिकवले जाते. पर्यटनासंबंधी शास्त्रीय माहिती येथे कळते आणि वारसाजतन कसा करायचा, याच्यासंबंधी अभ्यासक्रम शिकवला जातो. सर्वात महत्वाचे म्हणजे काळाआड दडलेली प्राचीन भारतीय संस्कृतीस वर्तमानात आणण्यासाठी उत्खनन कसे करावे, हे शिकवले जाते आणि त्याचा कालखंड कसा ठरवायचा, याबद्दलचे प्रशिक्षण दिले जाते.
येथे कुठलीही पदवी प्राप्त झालेल्या विद्यार्थांस या कोर्सला प्रवेश घेता येतो. प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र या विषयात एम.ए. या कोर्स साठी प्रवेश चालू आहे.
- रोजगाराच्या संधी
पुरातत्वशास्त्रात M.A. केल्यावर NET ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर प्राध्यापक म्हणून आपले करिअर करता येते. - Archaeological Survey of India, New Delhi तसेच पुरातत्व व वस्तुसंग्रहालय महाराष्ट्र शासन या दोन्हीकडे तसेच निरनिराळ्या राज्यांच्या पुरातत्वखात्यामध्ये Archaeologist म्हणून काम करता येते.
- वस्तुसंग्रहालयात अभिरक्षक म्हणून काम मिळू शकते.
- संशोधनाची आवड असणा-यांना Ph.D तसेच Post Doctoral फिलोशिप, स्कॉलरशिप UGC, ICHR किंवा परदेशातील विद्यापीठाकडून अर्थसहाय्य घेऊन संशोधन करता येते.
- Archaeological Survey of India, New Delhi येथून M.A. नंतर Diploma in Archaeology हा कोर्स करून पुरातत्वशास्त्रामधील खात्यात कोठेही नोकरी मिळू शकते.
- संशोधन, उत्खनन कार्यात भाग घेता येतो.
विभागप्रमुख
डॉ. सौ. माया ज. पाटील
- संपर्क
डॉ. प्रभाकर कोळेकर (9922520985)
डॉ. सदाशिव देवकर (8999316095/9011564001)
ज्ञानेश्वर झरकर (९०४९४८८८११/९८३४२१०४२१)