परभणीत रविवारी राज्यव्यापी लिंगायत धर्म महामोर्चा
सोलापुरातून हजारो कार्यकर्ते जाणारः विजयकुमार हत्तुरे
सोलापूर ( नाना हालंगडे )
लिंगायत धर्माची संविधानिक मान्यता रद्द झाल्याने लिंगायत धर्म बांधवांना धार्मिक अल्पसंख्याकांच्या कोणत्याही सवलती आणि हक्क मिळत नाहीत. त्यामुळे लिंगायत धर्माला संविधानिक मिळण्यासाठी आणि राज्यस्तरावर अल्पसंख्याक दर्जा मिळावा या मागणीसाठी *रविवार, दि.24 ऑक्टोंबर 2021 रोजी दुपारी 12 वाजता परभणी* येथे राज्यव्यापी लिंगायत धर्म महामोर्चा होणार आहे. अशी माहिती *अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीचे महासचिव विजयकुमार हत्तुरे* यांनी दिली. या मोर्चाला शहरातून हजारो बांधव जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या महामोर्चात राज्यातील व देशातील प्रमुख धर्मगुरु व समाज बांधव सहभागी होणार आहे. *लिंगायत धर्माच्या संविधानिक मान्यतेसाठीची राज्य सरकारने केंद्र सरकारकडे त्वरित शिफारस करावी, राज्यातील लिंगायत धर्मियांना, धार्मिक अल्पसंख्याकांचा दर्जा जाहीर करावा, लिंगायत बेरोजगार युवकांच्या उन्नतीसाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, मंगळवेढा येथील मंजूर असलेल्या महात्मा बसवण्णांच्या राष्ट्रीय स्मारकाचे काम त्वरित सुरु करावे, लिंगायत आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य अप्पाजींच्यामृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, परभणी शहरात महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा शासनातर्फे उभा करावा* आदी मागण्यांसाठी लिंगायत महामोर्चा निघणार आहे. या महामोर्चासाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून हजारो लिंगायत समाजबांधव परभणीकडे शनिवारी रवाना होणार आहेत. महामोर्चाची राज्यव्यापी जय्यत तयारी करण्यात येत आहे, असेही हत्तुरे म्हणाले. या राज्यव्यापी महामोर्चात सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन हत्तुरे यांनी केले आहे. यावेळी *लिंगायत समन्वय समितीचे शहर अध्यक्ष सकलेश (अण्णा)बाभुळगावकर, विकास मरगुर, राजकुमार व्हनकोरे, श्रीशैल शेट्टी, धोंडाप्पा तोरणगी, बसवराज चाकाई,
नागेश पडनुरे, भीमाशंकर बिराजदार आदी उपस्थित होते.