पत्रकार सेवा संघाच्या सोलापूर शहराध्यक्षपदी विजयकुमार लोंढे
सोलापूर शहर नूतन कार्यकारणी जाहीर
- हेही वाचा : आबासाहेब, तुम्ही गेल्यावर लालपरीही पोरकी झालीय
सोलापूर : थिंक टँक न्यूज नेटवर्क
पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य सोलापूर शहराची नूतन कार्यकारणी सोलापुरातल्या शासकीय विश्रामगृहात जाहीर करण्यात आली. सोलापूरच्या शहराध्यक्षपदी विजयकुमार लोंढे, सचिवपदी प्रा.डॉ.राजदत्त रासोलगीकर तर सहसचिवपदी अभिजीत भंडारे यांची निवड करण्यात आली. शहर उपाध्यक्षपदी प्रा.संग्राम कांबळे, सोलापूर शहर संपर्क प्रमुख पदी रवी देवकर यांची तर दक्षिण तालुका अध्यक्षपदी समीर शेख यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी पत्रकार संघाचे जिल्हा मार्गदर्शक नागनाथ गायकवाड, राज्य कार्यकारणी सदस्य बाळासाहेब लोखंडे, बाबासाहेब बाबर, सतीश वडवराव,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संभाजी साठे यांच्या हस्ते सर्व नूतन पदाधिकार्यांचा नियुक्तीपत्र देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संभाजी साठे हे होते. यावेळी महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब डोळसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष बोलताना म्हणाले की, सर्व पत्रकारांनी पत्रकार संघाच्या माध्यमातून निपक्षपाती व निर्भिडपणे कार्य करुन सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्यावे.तसेच बाबासाहेब बाबर यांनी पत्रकारितेचे महत्व विषद केले.
पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष रामनाथ जर्हाड यांनी सर्व पदाधिकार्यांचे फोनवरुन अभिनंदन केले आहे.यावेळी पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या संपर्कपदी संभाजी साठे यांची निवड झाल्याबद्दल नूतन सोलापूर शहर कार्यकारिणी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागनाथ गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन बाळासाहेब लोखंडे यांनी केले तर संग्राम कांबळे यांनी आभार मानले.