पत्रकार व्हायचंय? मग हे नक्की वाचा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात बी.व्होक (पत्रकारिता व जनसंज्ञापन पदवी) अभ्यासक्रमाच्या मोजक्याच जागा शिल्लक
- पत्रकार व्हायचंय? मग हे नक्की वाचा
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात बी.व्होक (पत्रकारिता व जनसंज्ञापन पदवी) अभ्यासक्रमाच्या मोजक्याच जागा शिल्लक
सोलापूर : विविध प्रसारमाध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. या माध्यमांत पत्रकार बनून काम करण्याची अनेकांना इच्छा असते. ही इच्छा पूर्ण करण्याची संधी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने उपलब्ध करुन दिली आहे. बी. व्होक (बॅचलर आॅफ व्होकेशनल जर्नालिझम) अर्थात पत्रकारिता व जनसंज्ञापन या तीन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाला बारावीनंतर थेट प्रवेश देण्यात येत आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मागील अनेक वर्षांपासून मास कम्युनिकेशन (पत्रकारिता व जनसंज्ञापन) हा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरु आहे. या अभ्यासक्रमाला कोणत्याही शाखेच्या पदवीप्राप्त विद्यार्थ्यास Entrance Exam. देऊन प्रवेश प्राप्त करता येतो. या विभागाचे अनेक विद्यार्थी राज्यभरातील विविध माध्यमांत चमकत आहेत. पत्रकारिता व नोकरीची हक्काची संधी त्यांना प्राप्त झाली आहे.
याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने मागील वर्षी बी.व्होक. (पत्रकारिता व जनसंज्ञापन) हा कौशल्याधारित तीन वर्षांचा अभ्यासक्रम सुरु केला आहे. या अभ्यासक्रमाला युजीसीने मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे या अभ्यासक्रमास बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यास कोणत्याही प्रवेश परिक्षेविना थेट अॅडमिशन दिले जात आहे. कोणत्याही अडथळ्याविना विद्यार्थ्यांना सहज प्रवेश मिळावा व त्यांच्यातील कौशल्ये विकसित व्हावीत, हा या मागचा हेतू आहे.
बी.व्होक. या पत्रकारिता पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून काही मोजक्याच जागा शिल्लक आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी तातडीने संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन विभागप्रमुख प्रा. डॉ. रवींद्र चिंचोलकर (संपर्क : 9860091855) यांनी केले आहे.
विविध माध्यमांत नोकरीच्या संधी
बी.व्होक. (पत्रकारिता व जनसंज्ञापन) अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना विविध माध्यमांत व शासकीय विभागात नोकरीची संधी प्राप्त होते. वृत्तपत्रे, टीव्ही, रेडिओ, एफ.एम., आॅनलाईन मीडिया, सिनेमा, जनसंपर्क, जाहिरात, माहिती व जनसंपर्क विभाग तसेत विविध खासगी व शासकीय विभागांतील जनसंपर्क अधिकारी अशा विविध क्षेत्रांत नोकरीची संधी प्राप्त होते.
बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पर्वणी
बी.व्होक. या पत्रकारिता पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून काही मोजक्याच जागा शिल्लक आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी तातडीने संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन विभागप्रमुख प्रा. डॉ. रवींद्र चिंचोलकर (संपर्क : 9860091855) यांनी केले आहे.