निसर्गाचे ऐकाल तर निरोगी रहाल!

चर्चा तर होणारच : लिहिताहेत डॉ. नाना हालंगडे

Spread the love
विषाणूंचा उद्रेक, ऑक्सिजनची कमतरता या बाबी आपल्याला कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये अनुभवास आलेले आहेत. यासारख्या कारणांनी पर्यावरण संरक्षणाची आवश्यकता गांभीर्याने आपल्यासमारे आली आहे. स्वच्छ पर्यावरणच आपल्याला निरोगी आणि समृध्द ठेवेल.

निसर्ग आपल्या निरोगी बनवतो. असे जगभरातील विविध अभ्यासात दिसून आले आहे. विज्ञान म्हणते निसर्ग आपला मेंदू, शरीर, भावना आणि विचार प्रक्रियेवर प्रभाव टाकतो. निसर्ग स्मरणशक्ती वाढवतो, निसर्ग आनंद देतो, जखम लवकर भरतो, एकाग्रता वाढवतो, वजन घटवण्यास मदत करतो, विटॅमिन डी देतो, ताण कमी करतो, वयाचा परिणाम कमी करतो, विषाणूशी लढणार्‍या पांढर्‍या रक्तपेशी वाढवितो. व डोळ्यांचे संरक्षण करतो. विषाणूंचा उद्रेक, ऑक्सिजनची कमतरता या बाबी आपल्याला कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये अनुभवास आलेले आहेत. यासारख्या कारणांनी पर्यावरण संरक्षणाची आवश्यकता गांभीर्याने आपल्यासमारे आली आहे. स्वच्छ पर्यावरणच आपल्याला निरोगी आणि समृध्द ठेवेल.

धरणीतून मृदा, नदीतून जल, सुर्यापासून अग्नि, पर्वतापासून धैर्य, आणि हवेतून प्राणवायू घेवून ईश्‍वराने माणूस घडविला. आपले जिवन पर्यावरणाच्या या साच्यातून घडलेले आहे. म्हणून पर्यावरणाचे रक्षण केले तरच हे मनुष्य जिवन वाचेल जिवन शैलीतील या सहा बदलांचा अंगीकार करून आपण पर्यावरण वाचवू शकतो. अन्नाची नासधूस कमी केली तर, 70 लाख टन उत्सर्जन कमी होते. 8 टक्के पर्यत कार्बन उर्त्सजन कमी होवू शकते. जर आपण रोज होणारी अन्नाची नासाडी थांबविली तर, देशात दरवर्षी 50 किलो अन्नधान्य वाया जाते. 2021 मध्ये जगात 9 कोटी टन अन्न वाया गेले होते. यात पाणी व पैसा वाया तर गेलाच शिवाय पर्यावरणाचे प्रचंड नुकसान झाले. असे दरवर्षी अन्न वाया घालविल्याने 70 लाख टन मिथेन वायूचे उर्त्सजन होत असते. पेपर मगचा वापर बंद करा यात 65 लाख वृक्ष वाचतील जगात दरवर्षी 16 अब्ज पेपर मगचा वापर केला जात आहे. एवढे कप तयार करण्यासाठी लाखो वृक्ष कापले जातात. आणि चार अब्ज गॅलन पाणी वाया जाते. याच प्रकारे जगात दरवर्षी एक टन टिश्यू पेपरचा वापर होत आहे. तोपण मर्यादित केला जावू शकतो.

वायफाय बंद ठेेवले तर, उत्सर्जन 16 टक्के कमी होईल. घरी वापरल्या जाणार्‍या विजेच्या 75 टक्के भाग स्टॅण्डबायमध्ये जातो. म्हणजे उपकरण वापरात नसेल तेंव्हा बंद ऑन असते आणि विज वापर सुरू असतो. परंपरागत बल्बपण 90 टक्के उर्जा उष्णता निर्माण करण्यास वाया घालवतात. ती एलईडी बल्बचा वापर करावा. कधीही टिव्ही, पंखे, वायफाय, कॉॅम्प्युटर, लॅपटॉप, प्रिंटर, बंद करायचे विसरू नका. यामुळे 40 टक्के कार्बन उत्सर्जन होत आहे. हे केवळ विजनिर्मीतीमुळे होते. उत्सर्जनात विजेचा गैरवापरचा वाटा 16 टक्के आहे. 1 झाड लावून आपण एक टन कार्बनडाय ऑक्साईड कमी करू शकतो. एक झाड रोज 21 किलो कार्बनडायऑक्साईड शोषून घेतो. 100 वर्षात ते कमीतकमी 1 टन कार्बनडायऑक्साईड कमी करतो. अशाप्रकारे वृक्ष आपल्याला, पर्यावरणाला स्वच्छ तर ठेवतातच शिवाय ऑक्सिजनच्या रूपाने दरवर्षी दहा लोकांना प्राणवायू पुरवतात.

कारचा वेग 70 पेक्षा कमी तर प्रदुषण 8 टक्क्यांनी कमी होईल. 1.7 अब्ज टन प्रदूषित हवा केवळ वाहनामुळे पर्यावरणात मिसळते कारचा वेग तुम्ही ताशी 70 ते 80 किमी किंवा कमी ठेवाल तर, 8 टक्के प्रदूषण कमी होईल. शहराबाहेर महामार्गावर वाहनांचा 80 ते 90 वेग मर्यादाची होणारी हानी निसर्ग कमी करू शकतो. आपली वाहने योग्य गतीने चालवून आपण ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जन निम्मे करू शकतो. 28 टक्के अधिक इंधन वापरले जाते. जर कार ताशी शंभर किमीपेक्षा अधिक वेगाने चालविली तर, घरी पुर्नभरणची सोय असेल तर, नैसर्गिक आपत्ती थांबतील 2001 पासून ते 2018 दरम्यान दुष्काळ व पूर यासारख्या 74 टक्के नैसर्गिक आपत्ती जलवायू परिवर्तनामुळे आल्या. दुसरीकडे शहरात रस्ते व कडक थरामुळे पावसाचे 90 टक्के पानी वाहून जाते.

जंगलामध्ये पावसाचे सुमारे 90 टक्के पानी जमीन शोषून घेते. आपल्या घरी छतावर पुर्नभरणाची यंत्रणा बसवून आपण पाणी जमिनीत मुरवू शकतो. 2 लाख लिटर पावसाचे पाणी दरवर्षी 200 चौरस मिटरचे एक घर पुर्नभरण करून जमिनीत पोहचवू शकते. म्हणून म्हणतो एका वृक्षाचे महत्व जाणा.  एक वृक्ष आपल्याला दहा लोकांना पुरेल एवढा ऑक्जिसन वर्षभर देतो. म्हणून श्‍वासाचे हे महत्व समजून घ्या. आजच एक वृक्ष लावा निसर्गाची हाक ऐकाल तर, निरोगी रहाल.

बस्स आणखी काय…

– डॉ. नाना हालंगडे, डिकसळ


टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका