नराळे गावात लांडग्याच्या हल्ल्यात ३ शेळ्या ठार
३६ हजार रुपयांचे नुकसान
सांगोला/ डॉ. नाना हालंगडे
सांगोला तालुक्यातील नराळे येथील वयोवृध्द वैंजता काकेकर यांच्या ३ शेळ्या लांडग्यांनी फस्त केल्या असून, 36 हजार रुपयाचे नुकसान यामध्ये झाले आहे. ही घटना मंगळवार, १९ ऑक्टोंबर रोजी रात्री ६ वाजता घडली.
याबाबत माहिती अशी की, नराळे येथील वैजयंता मारुती काकेकर ह्या गावातील काकेकर वस्ती येथे एकट्या राहतात. दिवसभर शेळ्या रानात हिंडविल्यानंतर त्या शेळ्या घरासमोर बांधून गावात दवाखान्यात गेल्या. त्याच दरम्यान लांडग्यांनी या तिनही शेळ्यावर हल्ला केला. यामध्ये या तीनही शेळ्या ठार झाल्या. दरम्यान आजीबाई घरी आल्यानंतर ही बाब निदर्शनास आली. दरम्यान 2 शेळ्या सापडल्या पण 1 सापडली नाही, यामध्ये आजिबाईंचे 36 हजार रुपयाचे नुकसान झाले.
दरम्यान, याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले. मात्र त्यांनी उद्या सकाळी पंचनामा करू असे सांगून हात झटकले.