दुष्काळी भागाच्या पाण्याचा संघर्ष सुरूच ठेवू : डॉ. बाबासाहेब देशमुखांची घोषणा
स्व. भाई गणपतराव देशमुख व नागनाथआण्णा नाईकवडी यांच्याविषयी भावनिक पोस्ट करत केली घोषणा
फेसबुक पोस्ट नेमकी काय आहे ते पाहूया.
———–
चला पुन्हा आयुष्याच्या पेटवू मशाली….
कार्य हाच परिचय,संघर्ष हीच ओळख अन् सेवा हाच ध्यास मनी बाळगून पाण्यासाठी अविरत संघर्षमय जिवन जगणारी जोडी म्हणजे “आबासाहेब अन् नागनाथ आण्णा”
आबासाहेब म्हणजे महाराष्ट्र राज्याचे 1960 पासूनचे दुष्काळाचे चालते बोलते इतिहास, वर्तमानातले जागल्या आणि भविष्याचे दिशादर्शक….
आज ते जरी आपल्यासोबत नसले तरी आबांनी केलेल्या विकासाची, संघर्षाची गाथा काल ही होती,आज ही आहे अन् पुढे ही जिवंत राहील त्यांनी केलेल्या संघर्षामुळे ,त्यांनी सांगोल्याला दिलेल्या सोनेरी पर्वामुळे..
शेतमालाला भाव, फळबाग लागवड, शेतमाल प्रक्रिया, पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी या पाच मुद्यांवर आबांनी उभं आयुष्य खर्च केलं
त्यांच्यासोबत त्यांचे महत्वाचे शिलेदार म्हणजे “नागनाथ आण्णा”
त्यांचा परिचय म्हणजे १०सप्टेंबर १९४४रोजी ब्रिटीशांची तटबंदी भेदून सातारा कारागृहाच्या भिंतीवरून उडी मारणारी व्यक्ती ते
२६जुलै १९९५ कृष्णा खोऱ्यातील पाण्याचा हक्काचा समान वाटा मिळवण्यासाठी सांगली सातारा सोलापुर जिल्ह्यातील १३ दुष्काळी तालुक्यातील ८०,०००कष्टकरी शेतकरी वर्गाची आटपाडी येथे भव्य परिषद घेत पाण्यासाठी संघर्ष उभा करणारी व्यक्ती म्हणजे नागनाथ आण्णा…
त्यानंतर १मे २०००साली तब्बल दोनवेळा १३दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांचा भर पावसात सांगली कलेक्टर कार्यालयावर काढलेला भव्य मोर्चा ..
तेव्हापासून आबा आणि नागनाथ आण्णा ही जोडी म्हणजे “संघर्षाची व्याख्याच” दोघांनीही उभ्या आयुष्यात पाण्यासाठी शेतकरी कष्टकरी वर्गासाठी संघर्षच पत्करला भोगला अन् आज आपल्याला जे सर्वसंपन्न आयुष्य उपभोगण्यास मिळतं आहे जी शेती सोन्याच्या मोलाने उत्पादने देते आहे जे पाणी आपल्या वाटणीस आले त्याचे शिलेदार म्हणजे हीच ती जोडी….
त्यांनी केलेला संघर्ष नवा नाही सर्वांना ज्ञात आहेच पण हा संघर्ष पुन्हा जागवायचा आहे,पुन्हा सर्वांची मोट बांधायची आहे…
झालेली पडझड आता नव्या पालवीच्या रुपाने बहरवायची आहे….
डॉ. बाबासाहेब देशमुख (भाई स्व. गणपतराव देशमुख यांचे नातू)
- हेही वाचा : ‘बाबासाहेब’ तुम्हीच आहात ‘आबासाहेब’