
अहमदनगर : विशेष प्रतिनिधी
वेगवेगळ्या राजकीय घडामोडींमुळे सांगोला तालुका हा नेहमी महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत राहिला आहे. अशीच एक महत्त्वपूर्ण घटना समोर आली आहे. शिर्डी (जि. अहमदनगर) येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या शिबिरात शरद पवार यांनी थेट रुग्णालयातून मंचकावर येत उपस्थिती लावली. शिबिरात मार्गदर्शन करून तेथून बाहेर पडताना सांगोल्याचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांना जवळ बोलावून घेत कानमंत्र दिला. खा. शरद पवार यांनी दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या कानात नेमके काय सांगितले असावे? याचा अंदाज समाज माध्यमांवर लावला जात आहे. याबाबतचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला असून त्याची सांगल्यासह सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र चर्चा सुरू आहे.
खा. शरद पवार आणि दीपकआबांच्या भेटीचा व्हिडिओ नक्की पाहा
माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या आई श्रीमती शारदादेवी काकासाहेब साळुंखे-पाटील यांचे काही महिन्यापूर्वी निधन झाले होते. या निधनानंतर मागील दहा दिवसापूर्वी खासदार शरद पवार हे सांगोल्याला दीपकआबांच्या सांत्वनासाठी येणार होते. मात्र प्रकृती अस्वास्थ्यमुळे त्यांचा दौरा रद्द झाला होता. बहुतेक या दौऱ्याचा संदर्भ परवाच्या शिर्डी भेटीतील या संवादामागे असावा असेही सांगितले जात आहे.
शिर्डी (जि. अहमदनगर ) येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मंथन शिबिरासाठी आलेले राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यामुळे हे चिंतन शिबिर मोठे चर्चेचे झाले. शिबिर संपवून पुन्हा रुग्णालयात जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांनी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील यांना कानमंत्र दिला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याविषयी सांगोला तालुक्यात चर्चा सुरु झाली आहे.
रुग्णालयातून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला देऊनही खास पक्षाच्या शिबिरासाठी आलेल्या खा . शरद पवार यांनी पुन्हा रुग्णालयात जात असताना जवळ बोलावून दिपकआबा साळुंखे पाटील यांना नेमके काय सांगितले? याबाबत आता सांगोला तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून तर्क वितर्क लढविले जात आहेत.
मागील महिन्यात होता दौरा
मागील महिन्यात खा. शरद पवार यांचा नियोजित सोलापूर दौरा प्रकृती अस्वास्थ्यामुळे रद्द झाला होता. या दौऱ्यात ते माजी आमदार दीपक साळुंखे – पाटील यांच्या जवळा (ता . सांगोला) येथील घरी भेट देणार होते व बार्शी येथेही त्यांचा एक नियोजित कार्यक्रम होता. परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनतर अवघ्या काही दिवसांतच त्यांना उपचारासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
त्यांना डॉक्टरांनी सक्त विश्रांतीचा सल्ला दिला होता. मात्र, गप्प बसतील ते शरद पवार कसले? हाताला बँडेज असताना खा . शरद पवार यांनी पदाधिकारी यांच्या शिर्डी येथील शिबिरास उपस्थिती लावून मार्गदर्शन केले.
दीपकआबांना जवळ बोलावून घेतले
राष्ट्रवादीचे शिबीर संपून जाताना खा. शरद पवार यांनी दीपक साळुंखे – पाटील यांना जवळ बोलावून घेतले. त्यांच्यासोबत ते काहीतरी बोलले. हा व्हिडिओ सांगोला तालुक्यात सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
दीपकआबांसोबत जिव्हाळ्याचे संबंध
खा. शरद पवार यांचे दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्यासोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. शरद पवार हे माढा लोकसभा निवडणूक लढवण्यापूर्वी दीपक आबा हे सोलापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष होते. त्यावेळी माढा लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराची सर्व धुरा दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्यावर होती. दीपकआबा साळुंखे-पाटील यांना सोबत घेऊन शरद पवार यांनी अख्खा मतदारसंघ पिंजून काढला होता. मोठ्या मताधिक्याने शरद पवार हे माढा लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले. यामध्ये दीपकआबा साळुंखे-पाटील यांचाही सिंहाचा वाटा होता. त्याच्याही पूर्वीपासून दीपकआबा साळुंखे पाटील आणि शरद पवार यांचे ऋणानुबंध खूप जुने आहेत.
मागील दहा दिवसापूर्वी खासदार शरद पवार हे सांगोल्याला दीपकआबांच्या सांत्वनासाठी येणार होते. मात्र प्रकृती अस्वास्थ्यमुळे त्यांचा दौरा रद्द झाला होता. बहुतेक या दौऱ्याचा संदर्भ परवाच्या शिर्डी भेटीतील या संवादामागे असावा असेही सांगितले जात आहे.
जुनोनी वारकरी अपघाताबाबत धक्कादायक खुलासा; आजोबा नव्हे तर नातू चालवत होता कार