थंडीचा कडाका
पिके धोक्यात, रुग्णही वाढले
थिंक टँक / नाना हालंगडे
उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात थंडीची लाट आली आहे. तब्बल पाच राज्यात पुन्हा तापमान कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. देशात थंडीची लाट आली आहे. उत्तर भरातात अनेक जिल्हे हे थंडीने गारठले आहेत. नागरिक शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करत आहेत. त्यात प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना देखील थंडीचा फटका बसत असून त्यांच्यासाठी खास हिटर आणि ब्लँकेटची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यात देखील थंडीची लाट आली आहे. अनेक जिल्ह्यात पारा घसरला आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणात थंडी वाढली असून याचा परिणाम पिकांवर होत आहे. (Weather Update News)
देशातील वातावरणात बदल असून कुठे थंडीचा कडाका तर ढगाळ वातावरण देखील आहे. उत्तर भरातात मोठ्या प्रमाणात धुके देखील पडल्याने याचा परिणाम सार्वजनिक वाहतुकीवर देखील झाला आहे. राज्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यांत येत्या काळात थंडी वाढणार आहे.
पारा हा १० ते १२ अंश सेल्सिअसच्या एवढा आहे. यात आणखी घट होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सफदरगंजमध्ये सर्वात कमी १.९ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर राजस्थान, बिहारमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसात उत्तर मध्य महाराष्ट्राचा काही भाग, सलंग्न मराठवाडा भाग तसेच विदर्भात तापमानात घट झाली आहे. पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव काही भागातही थंडी वाढण्याची शक्यता आहे.
विदर्भात काही भागांत थंडीच्या लाटेची स्थिती निर्माण होऊन गोंदियामध्ये राज्यातील नीचांकी ६.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यातील तापमानाचा पाराही घटला असून, थंडीत वाढ झाली आहे. उर्वरित महाराष्ट्रात दोन दिवसांत तापमानात घट होऊन थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. नागपूर येथे ८.०, ब्रह्मपुरी येथे ९.६, तर वर्धा येथे ९.४ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले. अकोला, अमरावती, बुलढाणा यवतमाळ आदी जिल्ह्यांतही १० ते ११ अंशांवर तापमान आले आहे. मराठवाड्यात औरंगाबाद येथे ९.४, तर उस्मानाबादमध्ये १०.१ अंश किमान तापमानाची नोंद झाली.
देशातील अनेक भागात कडाक्याची थंडी (Cold Weather) पडली आहे. थंडी आणि धुक्यामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेष उत्तर भारतात थंडीचा जोर अधिक वाढला आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूरमध्ये (kanpur) थंडीमुळं हृदयविकाराचा झटका आल्यानं 14 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळं नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दिवसेंदिवस थंडीचा जोर वाढत असल्याचं चित्र दिसत आहे.
उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये रात्री आणि सकाळी थंडी आणि दाट धुके पडत आहे. थंडीच्या लाटेचा मानवी जीवनावर परिणाम होत असल्याचं दिसत आहे. उत्तर प्रदेशमध्ये थंडीचा जोर इतका वाढला आहे की, थंडीमुळं हृदयविकाराच्या धक्क्यानं 14 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
दिल्लीत थंडीची लाट आणि धुक्याची चादर पसरली आहे. हवामान विभागानं आज दिल्लीत थंडीच्या लाटेचा ‘ऑरेंज अलर्ट’ आणि धुक्याचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. किमान तापमान 3 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. तर कमाल तापमान 18 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. धुक्यामुळे पालम आणि सफदरजंगसह अनेक भागात दृश्यमानता 50 मीटरपेक्षा कमी राहिली आहे. सध्या देशातील अनेक भागात डोंगरापासून मैदानी प्रदेशापर्यंत कडाक्याची थंडी जाणवत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढला आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. तसेच येत्या २४ तासांत तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय. त्यामुळे गारवा वाढल्याने थंडीची लाट राज्यात कायम राहण्याची शक्यता आहे.
गेल्या २४ तासांत विदर्भातील बुलडाणा आणि नागपुरातील तापमान ९ अंशापर्यंत खाली आलं होतं. पुढील 2 दिवसांत महाराष्ट्रातील विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजरात राज्यात थंडी वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.
अनेक जिल्हे हे थंडीने गारठले आहेत. नागरिक शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करत आहेत. त्यात प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना देखील थंडीचा फटका बसत असून त्यांच्यासाठी खास हिटर आणि ब्लँकेटची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यात देखील थंडीची लाट आली आहे. अनेक जिल्ह्यात पारा घसरला आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणात थंडी वाढली असून याचा परिणाम पिकांवर होत आहे.
वातावरणात बदल असून कुठे थंडीचा कडाका तर ढगाळ वातावरण देखील आहे. उत्तर भरातात मोठ्या प्रमाणात धुके देखील पडल्याने याचा परिणाम सार्वजनिक वाहतुकीवर देखील झाला आहे. राज्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यांत येत्या काळात थंडी वाढणार आहे. पारा हा १० ते १२ अंश सेल्सिअसच्या एवढा आहे. यात आणखी घट होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सफदरगंजमध्ये सर्वात कमी १.९ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर राजस्थान, बिहारमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसात उत्तर मध्य महाराष्ट्राचा काही भाग, सलंग्न मराठवाडा भाग तसेच विदर्भात तापमानात घट झाली आहे. पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव काही भागातही थंडी वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा
संभाजीराजे, स्वराज्य रक्षक की धर्मवीर? हिंदू धर्मातल्या औरंगजेबांची खेळी