तब्बल वीस महिन्यानंतर पहिली ते चौथीचे वर्ग सुरू होणार
सांगोला तालुक्यात 21 हजार 920 विद्यार्थी
- तब्बल वीस महिन्यानंतर पहिली ते चौथीचे वर्ग सुरू होणार
- सांगोला तालुक्यात 21 हजार 920 विद्यार्थी
- आठवी शिष्यवृ्ती परीक्षेत सांगोला तालुका अव्वल; 168 विद्यार्थी पात्र
थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
कोरोना महामारीमुळे मागील वीस महिन्यापासून संपूर्ण राज्यात पहिले ते चौथीपर्यंतची शाळा बंदच होती. पण राज्य शासनाच्या आदेशाने बुधवार 1 डिसेंबरपासून या शाळा सुरू होणार असून, सांगोला तालुक्यात अशा या शाळांची संख्या 452 इतकी असून, 21 हजार 920 विद्यार्थी असल्याचे गटशिक्षण अधिकारी प्रदीपकुमार करडे यांनी सांगितले.
- शेतीपंपाची आजपासून वीज तोडणी मोहिम
- महात्मा फुले : समता संगराचे धगधगते अग्निकुंड
- सांगोल्याच्या “त्या” नेत्याकडून “मातोश्री”चा उद्धार, शेतकऱ्याला केली शिवीगाळ
राज्यात कोरोनाचा उद्रेक वाढल्याने 17 मार्च 2020 पासून शाळा बंद करण्यात आल्या होत्या. त्या दरम्यान बारावी व दहावीच्या परीक्षा झाल्या. पण अन्य वर्गाच्या परीक्षा झाल्या नाहीत. गतवर्षी तर दहावी- बारावीच्या परीक्षा न घेता, त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात आला. त्यानंतर 2021 मध्येही कोरोनाने उग्ररूप धारण केल्याने ज्ञानमंदिरे बंदच होती. आता 15 ऑगस्ट नंतर शाळा सुरू करण्यात आल्या. तर पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग दीपावलीपूर्वी सुरू करण्यात आले. आता राज्य शासनाने 1 डिसेंबरपासून पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
सांगोला तालुक्यात पहिलीमध्ये 5 हजार 657 विद्यार्थी, दुसरीमध्ये 4 हजार 986 विद्यार्थी, तिसरीमध्ये 5 हजार 374 विद्यार्थी तर चौथीमध्ये 5 हजार 903 असे 21 हजार 920 विद्यार्थी आहेत. या सर्वांच्या शाळा सुरू होणार आहेत.
जरी शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण सुरूच होते. गटशिक्षण अधिकारी करडे यांनी चांगले नियोजन केले होते, असे जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार यांनी सांगितले. .
याच शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती परीक्षेत सांगोला तालुका जिल्ह्यात अव्वल आला असून, 8 वीच्या विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळविले. 168 विद्यार्थी पात्र झाले. तर चौथीचे 241 पात्र झाले आहेत. तालुक्यात 5 ते 12 चे वर्ग सुरू आहेत. आत्ता 1 डिसेंबरपासून पहिलीपासून शाळा सुरू होणार आहेत.