डोंगरगावची शलाका काळे उच्च शिक्षणासाठी जर्मनीला रवाना

सांगोला/नाना हालंगडे
सांगोला तालुक्यातील डोंगरगाव येथील कु.शलाका संजय काळे हिची Coburg University जर्मनी येथे Analytical Instruments, Measurements and Sensors Technology विषयात MS साठी निवड झाली आहे. अशा प्रकारच्या अभ्यासक्रमासाठी निवड होणारी ती तालुक्यातील पाहिली विद्यार्थिनी आहे. तिच्या या निवडीसाठी अभिनंदन होत आहे.
शलाका ही आदर्श शिक्षक संजय काळे गुरुजी यांची कन्या तर बॉडीबिल्डर संकेत काळे यांची लहान बहीण आहे.
शलाका ही चांडोलेवाडी शाळेतील पदवीधर शिक्षक श्री. संजय काळे यांची सुकन्या आहे. तिचे प्राथमिक शिक्षण जि. प.शाळा, डोंगरगांव, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पुणे येथे झाले असून तिने Lovely Professional University, Punjab येथून Computer technology and electronic मधून Engineering पूर्ण केले आहे. लवकरच ती पुढील शिक्षणासाठी जर्मनीला रवाना झाली आहे.
संजय काळे गुरुजींच्या दोन्ही मुलांनी सांगोला तालुक्याचे नाव रोशन केले आहे.याअगोदर बॉडी बिल्डर संकेतने महाराष्ट्र चांमपियान सह देशपातळीवर आपला दबदबा निर्माण केला आहे. काळे गुरुजींचे 32 जणांचे कुटुंबीय आहेत.
पण कौटुंबिक एकोपा यांना यशोशिखराकडे नेणारा ठरित आहे.संकेत बरोबर कन्या शलाका हिने ही उच्च शिक्षण घेण्याचे ध्येय निश्चित केल्याने तीही जर्मनीला रवाना झाली आहे.या दोन्ही बहीण भावा नी आपल्या कुटुंबीयांचे नावच. रोशन केले आहे.ही सांगोला तालुक्याच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे.
तिच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून भावी उज्ज्वल यशासाठी तिच्यावर शुभेच्छांाचा वर्षाव होत आहे.