डॉ. बाबासाहेब देशमुखच तालुक्याची घडी बसविणार : डॉ. निकिताताई देशमुख
भाईंच्या देवराईत ॲड.प्रांजली सावंत यांचा सत्कार

सांगोला / नाना हालंगडे
स्व. आबासाहेबांच्या स्वप्नातील सांगोला तालुका आम्हाला तुम्हा सर्वांच्या सहकार्याने घडवायचा आहे. सध्या आपण जे काही पाहत आहोत,ते खूपच विदारक आहे. तुम्हा सर्व मंडळींची अशीच साथ आम्हाला देत आहात. हे आज दसऱ्याच्या शुभदिनीच मला पहावयास मिळाले. त्यामुळे स्व. आबासाहेबांच्या स्वप्नातील सांगोला तालुका हा देशमुख कुटुंबीयच घडवेल असा विश्वास डॉ.निकिताताई बाबासाहेब देशमुख यांनी दिला.
सांगोला तालुक्यातील डिकसळ येथे भाईंच्या देवराईमध्ये दसऱ्याच्या दिवशी वकिली परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या ॲड.प्रांजली बिभीषण सावंत यांचा सत्कार डॉ.निकिताताई देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सांगोला तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक तुकाराम भुसनर, माजी मुख्याध्यापक मधुकर बाबर सर, माजी सरपंच शशिकला बाबर, निलाबाई भुसनर, श्रीमंत भुसनर, राजू गेजगे सर यांच्यासह अन्य मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होते.
सांगोला तालुक्यातील युवा हृदयसम्राट डॉ.अनिकेत (भैय्या) चंद्रकांत देशमुख

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.निकिताताई म्हणाल्या की, देशमुख कुटुंबीय तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. त्यामुळे आम्ही सर्व मंडळी समस्या जाणून घेण्यासाठी तालुकाभर दौरे करीत आहोत. याचवेळी गावोगावी स्व. आबासाहेबांच्या थोर कार्याची प्रचिती येत आहे. पण मध्यतरीच्या काही कालखंडात ही घडी विस्कटलेली आहे. ही घडी पूर्व पदावर आणण्यासाठी आम्ही आता जनसेवेसाठी चोवीस तास उपलब्ध आहोत. त्यात मी स्वतः वैद्यकीय क्षेत्रात स्त्रीरोगतज्ञ आहे. स्त्रियांच्या कोणत्याही समस्या असूद्या,त्या फक्त माझ्यापर्यंत पोहचवा. त्यांना नक्कीच न्याय देवू.
आज आपल्या भागातील प्रांजली सावंत हिने चांगल्या गुणांनी वकिली शिक्षण घेवून, गावाचे, सावंत कुटुंबीयांचे नाव उज्ज्वल केले आहे. हीच प्रांजली खूपच ॲक्टिव आणि हुशार आहे. हीच्या वकिलीचा ही तालुक्यातील गोर गरीब जनतेला लाभ होणार आहे. तर आपल्या गावातील ही भाईंची देवराई ही खूपच छान संकल्पना आहे. यातून ही स्व.आबा साहेबांच्या कार्याची प्रचिती येत आहे.
आबासाहेबांनी दिलेले ज्ञान मंदिर अन्य विकासकामे चिरस्थायी आहेत. याचा वारसा जपतच आपण हे काम सुरू ठेवूया. संपूर्ण देशमुख कुटुंबीय यासाठी तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचेही डॉ.निकिताताई देशमुख यांनी शेवटी सांगितले.
याच दरम्यान डॉ. निकिताताई यांनी डिकसळ गावातील आश्रम शाळेलाही भेट दिली. निवासी मुलांशी संवादही साधला. तर मागील आठ निधन झालेल्या शंकर पारसे यांच्या कुटुंबियांना सात्वनपर भेट देवून, आस्थेवाईकपणे चौकशी ही केली.
याचवेळी ॲड.प्रांजली सावंत,मधुकर बाबर,तुकाराम भुसनर,बिभीषण सावंत यांनीही आपले विचार व्यक्त केले.
यावेळी बंडू वाघमोडे, आप्पासो भुसनर,महादेव गोरड,दादासाहेब भुसनर,विमा प्रतिनिधी ज्ञानेश्वर निळे अश्विनी भुसनर, बाळू करांडे,संदीप भुसनर,संदीप करांडे यांच्यासह देवराई प्रतिष्ठानचे अन्य सदस्य,ग्रामस्थ,युवकवर्ग मोठ्या संख्येनी उपस्थित होता.
या कार्यक्रमाचे आभार काकासाहेब करांडे सर यांनी मानले.
पाहा खास व्हिडिओ