‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सोलापूरचे ऋणानुबंध’
द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन उत्साहात
सोलापूर : निवृत्त नायब तहसीलदार बी.के. तळभंडारे संकलित व थिंक टँक पब्लिकेशन्स प्रकाशित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सोलापूरचे ऋणानुबंध’ या ग्रंथाचे प्रकाशन नुकतेच झाले. आयु. तळभंडारे यांच्या परिवारातील सदस्यांच्या हस्ते संकलक तळभंडारे यांच्या उपस्थितीत हा सोहळा ऑनलाईन स्वरुपात झाला.
यावेळी यावेळी लता तळभंडारे, माया तळभंडारे, शितल तळभंडारे, कुणाल तळभंडारे, निहाल तळभंडारे, सिमरन बाबरे, विवेक तळभंडारे, ओंकार तळभंडारे आणि तेजस साखरे उपस्थित होते.