डॉ. निकिताताई देशमुख यांची कौतुकास्पद कामगिरी, २ हजार महिलांची आरोग्य तपासणी
थिंक टँक / नाना हालंगडे
महिला शक्तीचे कुटुंबासह देशाच्या विकासात असलेले महत्वाचे स्थान लक्षात घेऊन ती सक्षम असावी यासाठी तिच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. तिच्या आरोग्याची काळजी घेऊन आपण तिच्याप्रती असणारी कृतज्ञता व्यक्त करूया! असे प्रतिपादन स्त्रीरोगतज्ञ व अकोला प्रा.आ.केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.निकीताताई बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले.
2000 महिलांची आरोग्य तपासणी करुन हे अभियान प्रत्येक घरापर्यंत पोहचवून डॉ.निकीताताई बाबासाहेब देशमुख यांनी माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या शासनाच्या अभियानाची सांगोला तालुक्यात प्रभावी अंमलबजावणी केली. माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियाना अंतर्गत नवरात्र उत्सव दरम्यान विशेष मोहीम प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने महिला आरोग्य शिबिर मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाले.
घरातील स्त्री आपल्या कुटुंबासाठी विविध भूमिका अदा करत असताना तिचे स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष होते. कुटुंबाप्रति असणारी प्रेमाची भावना, मातृत्वाचा ओलावा आणि आपल्या कर्तव्याप्रति असणारी संवेदनशीलता यामुळे ती घरासाठी राबते, प्रसंगी स्वत:च्या गरजा, भावना, शरीर, प्रकृती याकडे लक्ष देत नाही. कुटुंबाची काळजी घेणार्या माता-भगिनींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राज्य शासनाने नवरात्रीच्या निमित्ताने ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान हाती घेतले होते. या अभियानाची प्रभावी अमंलबजावणी स्त्रीरोग तज्ञ डॉ.निकीता बाबासाहेब देशमुख यांनी करुन अभियान यशस्वीपणे राबवली.
26 सप्टेंबरपासून सांगोला तालुक्यात महिला, माता, गरोदर स्त्रीया यांच्या आरोग्य तपासणीसाठी अभियानाला सुरुवात करण्यात आली. या अभियानामध्ये 8 दिवसात 2000 महिला सहभागी झाल्या होत्या. 50000 आयन फॉलिक ऍसिडच्या टॅबलेट आणि पन्नास हजार कॅल्शियमच्या टॅबलेट असे वाटप करण्यात आले..
डॉ.निकीताताई देशमुख यांनी अभियानामध्ये किशोरवयीन मुलींच्या समस्या, मासिक पाळीच्या तक्रारी व उपाय,गरोदरपणातील आहार व समस्या विषयी मार्गदर्शन,स्तनपान करणार्या मातांना मार्गदर्शन, पिशवीच्या तोंडाचा व स्तनाच्या कॅन्सर, रजोनिवृत्ती (मेनोपॉस), योगासनाविषयी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे हिमोग्लोबिन तपासणी, ब्लड प्रेशर तपासणी, शुगर तपासणी, थायरॉईड तपासणी इतर रक्ताच्या चाचण्या, गर्भाशयाची तपासणी करण्यात आली. अकोला केंद्रातील 8 उपकेंद्रामधील प्रत्येक गावातील महिलांना डॉ.निकीताताई देशमुख यांनी मार्गदर्शन करुन तपासाणीसाठी विद्यार्थीनीसह महिलांना प्रेरित केले.
अभियानाच्या आरोग्य तपासणीत महिलांना विविध त्रास असल्याचे आढळून आले. यावेळी डॉ.निकीताताई देशमुख यांचेकडून वेळीच आजाराचे निदान झाल्याने महिलांना उपचार घेणे सुलभ झाले असल्याचे महिलां मधून सांगण्यात येत होते. आरोग्य शिबिरात औषधे देण्याची सुविधादेखील डॉ.निकीताताई देशमुख यांनी उपलब्ध करून दिली होती.
गंभीर आजारावर महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना किंवा आयुष्मान भारत योजनेअंतर्गत शस्त्रक्रियादेखील करण्यात येणार आहे.
दि.27 सप्टेंबर 2022 रोजी कमलापूर येथे, 28 सप्टेंबर रोजी एखतपुर येथे, 29 सप्टेंबर रोजी मांजरी येथे, 30 सप्टेंबर रोजी शिरभावी येथे, 1 ऑक्टोबर रोजी वाढेगाव येथे, 3 ऑक्टोबर रोजी बामणी येथे, 4 ऑक्टोबर रोजी मानेगाव येथे तर 6 ऑक्टोबर- अकोला येथील महिलांना अभियानाअंतर्गत मार्गदर्शन करण्यात आले.
अभियान यशस्वीपणे पार पाडण्यासाठी गंगाधर उंबरजे, आरोग्य सहा.शिंदे, येलपले, मडावी, कमलापूर येथे श्रीमती शेंडगे, अकोला येथे आरोग्य सेविका श्रीमती बोत्रे, आरोग्य सेवक श्री.जाधव, एखतपूर येथे आरोग्य सेविका श्रीमती अंकुशराव, आरोग्य सेविका श्रीमती सुरवसे, मांजरी येथे आरोग्य सेविका श्रीमती सुतार, आरोग्य सेवक श्री.पाटील, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.साना मुजावर, शिरभावी येथे आरोग्य सेविका श्रीमती क्षीरसागर, आरोग्य सेवक श्री गायकवाड, वाढेगाव येथे आरोग्य सेविका श्रीमती शिरसट, आरोग्य सेवक श्री.गुरव, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.कोळी, बामणी येथष आरोग्य सेविका श्रीमती नदाफ, आरोग्य सेवक श्री.बालचत्रे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.कोल्हे, मानेगाव येथे आरोग्य सेविका श्रीमती सुर्वे, आरोग्य सेवक श्री.कांबळे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.गाकयवाड बोत्रे सिस्टर, जगताप सिस्टर, जाधव आरोग्य सेवक, दिलीप गायकवाड यांनी परिश्रम घेतले.अभियानाप्रसंगी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती.
कोणत्या मोबाईलमध्ये Jio चा 5G सपोर्ट मिळेल? पाहा सर्व कंपन्यांच्या मोबाईलची यादी
पाहा खास व्हिडिओ