ठकुबाई ते कियारा, दगडोजीराव ते रिहान.. काळानुसार बदलली नावे
1940 ते 2022 पर्यंतची थक्क करणारी नावे
स्पेशल स्टोरी / नाना हालंगडे
बदल हा निसर्गाचा नियम आहे. काळ बदलला, वर्ष बदलले, माणसं बदलली तशी माणसांची नावही बदलली. नावाचा हा प्रवास ठकुबाई ते कियारा, दगडोजीराव ते रिहान असा आहे. वाचा 1940 ते 2022 पर्यंतची थक्क करणारी नावे.
वर्ष 1930-40
संपतराव, गणपतराव, रामराव, शामराव, माधवराव, विनायकराव, भिकाजीराव, दगडोजीराव, शिवाजीराव, रंगराव, नागोराव, केशवराव.
महिलांची नावे:
कोंडाबाई, कळसूबाई, गंगाबाई,चंद्रभागाबाई, यमुनाबाई, जमुनाबाई, कालिंदाबाई, कलूबाई, ललूबाई, शामाबाई, भामाबाई, रूक्मिणबाई, ठकुबाई, लक्ष्मीबाई.
वर्ष 1960-70
दिलीप, अंकुश, विलास, रमेश, सुरेश, संजय, मधूकर,सुधाकर,
सुर्यकांत, चंद्रकांत, व्यंकट, नामदेव, लक्ष्मण, धनराज, दिनकर, उत्तम, बालाजी, संभाजी,प्रकाश, गोविंद, दयानंद, देवानंद, सदानंद, बाळासाहेब, लालासाहेब.
बायकांची नावे:
कमल, मंगल, शामल, कोमल,विमल, रंजना, अंजना, सुधा, राधा, शोभा, कुसुम, नंदा, बबीता, गोदावरी, सुदामती, सरस्वती, पार्वती, जया, विजया,रेखा, सुरेखा, सुमन, सविता,नीलम, शालिनी, मंदाकिनी, आशा, उषा, सुनिता.
वर्ष 1980-90
महेश, गणेश, शैलेश, अमित, सुमित,विक्रम, प्रशांत, सुशिल, सुनिल,अनिल, ओमकार, विजय, विश्वास, विशाल, सुरज, धीरज, अमर, सागर, आकाश, अभिषेक,अभिजीत,अतिश, सतिश, दीपक, शरद, अमोल, रवि, प्रसाद,शिवशंकर, ज्ञानेश्वर, किशोर, अजय, अक्षय, अजित, सुजित, सौरभ,राहूल, रोहन, रोहित, ऋषिकेश, कृष्णा, योगेश, नागेश, प्रदीप, प्रवीण.
मुलींची नावे:
जयश्री, राजश्री, धनश्री, भाग्यश्री, दीपा,माधुरी, सारीका, माधवी, मयुरी, मेघा, संध्या, वनिता, नम्रता, रेणुका, गौरी, मोहीनी, मनिषा, कल्पणा, कल्याणी, किर्ती, आरती, अश्विनी, प्रिती, स्वाती, ज्योती, अनुजा, शैलजा,निता, प्रिया, सुप्रीया, स्नेहा, नेहा, ऋतुजा, गायत्री, वर्षा, शिवानी, सोनाली
वर्ष 2010-20
विराज, अधिराज, कविराज, सोहम, आर्यन, शिवांश, शिवम,
कार्तिक, नरेन, आरव, अद्वैत,ध्रुव,पार्थ,रायन, निर्वाण,वीर, रणवीर, धवल,कुशल, कुशांक, दर्शन, भार्गव, प्रियांश, अथर्व, सार्थक, वेदांत, सुशांत, हर्ष, सुयश, सक्षम, अरिजीत, रूद्र, रिहान, अमेय.
मुलींची नावे:
सिद्धी, साक्षी, सानवी, श्रिया, श्रद्धा, श्रावणी, मैथिली, नायरा,
मायरा, कियारा, रेवा, परि, अदिती, मनस्वी, प्राची, प्राप्ती, गार्गी, रिद्धी, आलिया, ईशा, दिशा, अनुष्का, क्रिती, निती, प्रांजल, पायल, माही, माहिश्वरी, खुशी, स्प्रूहा, अक्षरा, वीणा.
येणाऱ्या काळातील नावे:
प्रियांदविष, क्रियमिघांश, क्रुषविरांज, आर्यनिषांत, प्रद्विकांश्वर,
श्रेयमार्घव, स्मारविंन्नेष, गौरवांश्वर, मृदुलाशिष, व्रीजवांश, जरेय, वर्मिय, प्राघवेंद्द, ध्रशांत,भ्रद्विर,अव्रांशिष
मुलींची नावे
वीणाम्रिया, धृविकांचल, स्मितृविंशा, श्रींयांक्षा, क्षाक्षीरा, क्षक्षुश्रीणा, स्प्रूहांतिका, प्रेमश्रिया.
भाषेचा विकास
भाषा ही मानवाला मिळालेली एक बहुमूल्य देणगी आहे. भाषेच्या माध्यमातून प्रत्येक माणूस एकमेकांशी संवाद साधू शकतो. संवाद साधण्यासाठी लिहिणे, वाचणे, बोलणे, इशारे, हावभाव, मुक अभिनय, मुद्राभाव असे अनेक माध्यम आहेत. परंतु भाषा हे अतिशय प्रभावी साधन आहे. भाषा हे आपले विचार, मते, भावना आणि जाणिवा प्रगट करण्याचे एक साधन आहे. भाषेला इंग्रजी भाषेत लॅंग्वेज (language) असे म्हणतात. हा शब्द ‘लिंग्वा’ या लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे. लिंग्वाचा अर्थ जीभ असा होतो.
भाषेचा वापर करणे हे देखील एक कौशल्य आहे. आधुनिक काळात भाषेचा अभ्यास मोठ्या प्रमाणात होत आहे. तेही या नावांच्या बदलामागचे कारण असावे.
हेही वाचा
थर्टी फर्स्टला “माल” लावण्यासाठी सव्वा दोन लाख लोकांनी घेतला परवाना
“थिंक टँक लाईव्ह” हे Think Tank Digital Media चे महाराष्ट्रात सर्वाधिक वाचले जाणारे मराठी न्यूज पोर्टल आहे.
आमच्या यूट्यूब चॅनलला भेट देऊन नक्की सबस्क्राईब करा.
लिंक : https://youtube.com/@thinktanklive3626
आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जॉईन व्हा.
लिंक : https://chat.whatsapp.com/L40pxGK5Ysk4WO749oplZ1
आमचे फेसबुक पेजही फॉलो करा.
लिंक : https://www.facebook.com/thinktanklive?mibextid=ZbWKwL