ज्या गावात नोकरी त्या गावातच पगार करा

राज्यातील सरपंचांना पत्र; प्रमोद झिंजाडे

Spread the love

ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत असलेल्या सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांचा पगार ग्रामपंचायतीच्या बँक खात्यातून करण्यात यावा, अशी मागणी महात्मा फुले संस्त्येचे अध्यक्ष प्रमोद झिंजाडे यांनी राज्यातील सर्व सरपंचांना पत्रे धाडून केली आहे.

सांगोला/ नाना हालंगडे
ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत असलेल्या सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांचा पगार ग्रामपंचायतीच्या बँक खात्यातून करण्यात यावा, अशी मागणी महात्मा फुले संस्त्येचे अध्यक्ष प्रमोद झिंजाडे यांनी राज्यातील सर्व सरपंचांना पत्रे धाडून केली आहे.

खेड्याचा तथा गावाचा विकास करण्यासाठी प्रत्येक गावात ग्रामपंचायत कार्यरत आहेत. ग्रामपंचायतचा कारभार पाहण्यासाठी सरपंच, सदस्य व सचिव म्हणून शासकीय अधिकारी ग्रामसेवक कार्यरत आहेत. मात्र इतर विभागाचे म्हणजे शेती, पाटबंधारे, सार्वजनिक वीज, शिक्षण , वनविभाग, पोलीस, वायरमन असे इतर कर्मचारी गावात कधी येतात कधी जातात त्यांचा ग्रामस्थांशी त्यांच्या विभागाच्या योजना संदर्भात फारसा फायदा होताना दिसत नाही. पगार मात्र घेतात. आणि नेमून दिलेल्या गावात म्हणजे मुख्यालयी रहात नाहीत. मात्र घरभाडे घेतात.

वरीष्ठ अधिकार्यांनी कितीही परिपत्रके काढली तरी कर्मचारी वर्ग मुख्यालयात रहात नाहीत. जर एकद्या चांगल्या अधिकाऱ्याने हा प्रश्न लावून धरला तर कर्मचारी संघटना संबंधित मंत्री, आमदारांना हाताशी धरून त्या अधिकाऱ्याना शांत करण्यात यशस्वी होतात. यावर एक उपाय म्हणजे सर्व विभागाचे ग्रामपंचायत स्तरावरील सर्व कर्मचारी वर्गाचे पगार ग्रामपंचायत बँक खात्यात जमा करून तेथून सरपंच व सचिव यांच्या सह्याने कर्मचारीच्या बँकेत जमा होतील.

असे झाले तर सर्व कर्मचारी गावात राहतील. मात्र याला कर्मचारी त्यांच्या संघटना विविध पक्ष विरोध करतील. सरपंच हप्ते मागतील. अशा भिती दाखवून याला विरोध करतील. मात्र या कल्पनेला वरीष्ठ अधिकारी, सचिव यांचा मनापासून पाठिंबा मिळेल. मात्र राजकीय नेते, मंत्री आमदारांच्या भितीपोटी गप्प बसतील.हा निर्णय झाला तर ग्रामीण विकास झपाट्याने होईल. यासाठी ग्रामपंचायतीने या संदर्भात ग्रामसभेचा ठराव मंजूर करून तो अंमलबजावणीसाठी शासनाकडे पाठवावा. काही कालावधी देऊन जर शासन निर्णय घेण्यास टाळाटाळ करत आहे. असे लक्षात आले तर तज्ञ वकीलाचा सल्ल्याने जनहित याचिका दाखल करण्यासाठी विचार करायला हरकत नाही.

यावर महाराष्ट्रातील सर्व सरपंच, उपसरपंच सदस्य यांना माहितीसाठी गावात ग्रूप वर हा मेसेज पाठवावे तसेच आपल्याला हे योग्य आहे की अयोग्य आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. ही विनंती आपल्या प्रतिक्रिया सर्व सरपंच ग्रूप वर टाकल्या जातील. याचा सर्वांनी जरूर विचार करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका