गुन्हेगारीताजे अपडेटथिंक टँक स्पेशलशेतीवाडी
Trending
जुनोनी वारकरी अपघाताबाबत धक्कादायक खुलासा; आजोबा नव्हे तर नातू चालवत होता कार
आजोबावर चुकीची माहिती दिल्याचा गुन्हा दाखल

या अपघातावेळी एक अठरावर्षीय मुलगा कार चालवत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे त्याला कार कशी चालवावी याचे पुरेसे ज्ञान नसावे हे या अपघातातून पुढे आलेल्या तथ्यातून दिसून येते.
थिंक टँक : विशेष प्रतिनिधी
सांगली – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील जुनोनी (ता. सांगोला) गावाजवळ दोन दिवसांपूर्वी वारकऱ्यांच्या दिंडीत कार घुसून सात वारकऱ्यांचा मृत्यु झाला होता. या भीषण अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघातातील कार हा आजोबा नव्हे तर नातू चालवत चालवत असल्याचे समोर आले आहे.
विशेष म्हणजे त्याला कार कशी चालवावी याचे पुरेसे ज्ञान नव्हते. पुलावरून कार उताराला लागल्यावर कारची गती वाढली. मात्र त्याच वेळी त्या मुलाने ब्रेक लावण्याऐवजी एक्सलेटर दाबला असावा. कारवरील नियंत्रण सुटले असावे, असा अंदाज आहे. नातूचा गुन्हा लपविण्यासाठी त्याच्या आजोबाने आपण स्वतः कार चालवत असल्याची चुकीची कबुली पोलिसांकडे दिली.
या माहितीला सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दुजोरा दिला असून त्यादिशेने तपास चालू असल्याचे “थिंक टँक”शी बोलताना त्यांनी सांगितले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मंगळवार, १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सांगली – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील जुनोनी (ता. सांगोला) गावाजवळ माऊली विठ्ठल भक्ती मंडळ जठारवाडी (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) यांच्या पायी दिंडीत कार घुसल्याने सात वारकरी जागीच ठार झाले होते. या अपघातामध्ये पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व मृतांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार जठारवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
याप्रकरणी सांगोला पोलिसांनी एसयूव्ही कारचालकासह अन्य एकजणावर गुन्हा दाखल केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले होते. यात धक्कादायक माहिती अशी की, या अपघातावेळी एक अठरावर्षीय मुलगा कार चालवत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे त्याला कार कशी चालवावी याचे पुरेसे ज्ञान नसावे हे या अपघातातून पुढे आलेल्या तथ्यातून दिसून येते.
पुलावरून कार उताराला लागल्यावर कारची गती वाढली. मात्र त्याचवेळी त्या मुलाने ब्रेक लावण्याऐवजी एक्सलेटर दाबला असावा, असा अंदाज आहे. नातूचा गुन्हा लपविण्यासाठी त्याच्या आजोबाने आपण स्वतः कार चालवत असल्याची चुकीची कबुली दिली. मात्र पोलिसांनी खोलात जावून याचा तपास केला असता ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या अपघातात एसयूव्ही कार चालविणाऱ्या मुलाचे नुकतेच 18 वर्षे पूर्ण झाले आहेत. त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. नातवाला या गुन्ह्यात वाचविण्यासाठी कारमध्ये असलेल्या त्याच्या आजोबाने दोष स्वीकारण्यासाठी खोटी कबुली दिल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे.
“थिंक टँक”शी बोलताना सांगोला पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनंत कुलकर्णी म्हणाले, “आम्ही वारकऱ्यांच्या मृत्यूप्रकरणी 18 वर्षीय मुलावर व त्याच्या आजोबावर आयपीसीच्या कलम 304 (सदोष मनुष्यवध) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आपण वाहन चालवत असल्याची कबुली चुकीच्या पद्धतीने दिल्याबद्दल भादंवि 177 कलम वाढविण्यात आले आहे.
पोलीस महानिरीक्षकांनी दिली भेट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यामुळे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप हे अपघातस्थळी ठाण मांडून होते.
https://thinktanklive.in/?p=5553
https://thinktanklive.in/?p=5557