जुजारपुरात २८ वर्षाच्या विवाहितेचा अनैतिक संबंधातून खून
सांगोला : / एच. नाना : अनैतिक संबंधाच्या कारणाने नवरा परगावी गेला असताना 28 वर्षे विवाहितेच्या मानेला गंभीर इजा करून तिचा खून करण्यात आला आहे. शिवाय हे प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून संबंधित विवाहितेचा मोबाईल ही घेऊन मारेकरी फरार झाला आहे.ही घटना सांगोला तालुक्यातील जुजारपूर येथे शुक्रवार(ता. 22) रोजी पहाटे पाच वाजण्याच्या पूर्वी घडली.
याप्रकरणी खून झालेल्या विवाहितेच्या चुलत दिराने सांगोला पोलिसात फिर्याद दिली आहे.खून केलेल्या आरोपीने कोणाला काही कळू नये म्हणून तिचा मोबाईल नेला असल्याचा प्रकारही यात समोर आला आहे.
खून झालेल्या महिलेचा पती कंटेनरवर चालक आहे.त्यास काही दिवसांपूर्वी तिच्या मोबाईलमध्ये असलेल्या मेसेजवरून पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आला होता. त्यावरून त्या दोघांमध्ये वादही झाला होता. तिचा पती बाहेरगावी गेल्याची संधी साधून तिच्या मानेला इजा करून तिचा खून करून जाताना आरोपीने तिचा मोबाईलही नेला आहे.
मयत महिलेचे चुलत दीर व त्यांची पत्नी हे शुक्रवारी शेतात पिकाला पाणी देऊन पहाटे पाच वाजताच्या सुमारास येत असताना मृत महिलेची दोन मुले घराबाहेर रडत बसली होती.मुले का रडतात पहिले तेव्हा सदर महिला स्वयंपाक घरात फरशीवर निपचित पडली होती.आवाज देऊनही तिने प्रतिसाद दिला नाही. तेव्हा हा खुनाचा प्रकार उघडकीस आला.पोलीस निरीक्षक सुहास जगताप हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.