आरोग्यताजे अपडेटथिंक टँक स्पेशलरोजगार/शिक्षण

जिल्ह्यात 11 सप्टेंबरपर्यंत तुफान पावसाची शक्यता

सतर्क राहण्याचे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे आवाहन

Spread the love

थिंक टँक / नाना हालंगडे
प्रादेशिक हवामान विभाग  मुंबई यांचेकडून हवामान विषय मिळालेल्या पूर्व सुचनेनुसार सोलापूर जिल्हयात 11 सप्टेंबर 2022 या कालावधीत जिल्हयात अलर्ट जारी केला आहे. काही  ठिकाणी मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची आणि विजा चमकण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

ग्रामस्थांनो, तुमच्या गावात स्मशानभूमी नसेल तर प्रस्ताव पाठवा

*नागरिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी*

विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून विद्युत स्त्रोतांपासून अलग करुन ठेवावीत. दूरध्वनी ,भ्रमणध्वनीचा वापर टाळावा. विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजेच्या खांबांपासून लांब राहावे. विजा चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये. एखाद्या मोकळया परिसरात असल्यास,गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे. धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात.

*मुसळधार पावसात पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी*
मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर जाणे टाळा. घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. अतिमुसळधार व अतिवृष्टीच्या परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी राहा व पायी अथवा वाहनाने प्रवास करू नका. घराबाहेर पडणे अत्यावश्यक असल्यास निघण्यापूर्वी अधिकृत स्त्रोतांकडून हवामानाची रेल्वेची व रस्ते वाहतूकीची व पाणी तुंबलेल्या ठिकाणांची माहिती करून घ्या. पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नये. मोबाईवर संभाषण करु नये आणि इलेक्ट्रिक वस्तुपासून दुर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा.

शेततळे अस्तरीकरणास ७५ हजारांपर्यंत अनुदान

मुसळधार पावसामुळे उध्दभवलेल्या कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर दूरध्वनी क्रमांक 0217- 2731012 या दूरध्वनीवर संपर्क साधावा. हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या www.imdumumbai.gov.in या संकेतस्थळावरून घ्यावी. कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका व अफवा पसवरू नका. अतिवृष्टी कालावधीत झाडे पडणे. घर किेवा इमारत कोसळणे , पूर येणे ,दरडी कोसळणे अशा आपत्ती घडण्याची शक्यता असते अशावेळी नागरिकांनी सर्तक राहावे. आपत्कालीन स्थिती उदभवण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी जसे दरड प्रवण क्षेत्र याठिकाणी आपण राहत असल्यास प्रशासनाकडून मिळणा-या सुचनांचे पालन करावे. पूर प्रवण क्षेत्र व पाणी तुंबण्याची ठिकाणे या ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती उदभवल्यास त्याबाबत जागरुक राहावे व  योग्य ती दक्षता घेण्यात यावी.

सांगोलेकरांनो सावधान, लम्पी त्वचा आजार फैलावतोय
जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती .पूल इ. ठिकाणी जाऊ नये.

अतिवृष्टी होत असल्यास कोणीही नदी नाले इ. ठिकाणी जाऊ नये. अतिवृष्टी  कालावधीत रस्ते निसरडे बनल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी वाहन चालवताना आवश्यक ती काळजी घेण्यात यावी. पूराच्या पाण्याजवळ अथवा नदी पात्रात उभे राहून नागरिकांनी  सेल्फी काढू नये. आपत्कालीन परिस्थिती सेल्फी काढून नागरिकांनी स्वत:चा जीव धोक्यात घालू नये.

हवामान विभागाकडून दिलेल्या इशा-याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणतर्फे करण्यात आले आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका