जिल्हा परिषदेत कक्ष अधिकाऱ्यास लाच घेताना रंगेहाथ पकडले
दिवाळी सुट्टीनंतर पहिलाच दिवशी एसीबीची धाड
सांगोला/ एच.नाना
सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातील कर्मचाऱ्याला लाच घेताना आज सोमवार ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता रंगेहाथ पकडले आहे. या अटक केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव बसवेश्वर स्वामी असे आहे. ही कारवाई सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.
विशेष म्हणजे ज्यांच्या दालनात ही कारवाई झाली ते सभापती सांगोला तालुक्यातील आहेत. ज्यांना लाच घेताना पकडले तेही सांगोला तालुक्यातीलच आहेत.
बसवेश्वर स्वामी हे गेली कित्येक वर्षापासून या विभागात काम करीत होते. यांच्या विषयी असंख्य तक्रारी ही होत्या. विशेष म्हणजे हे समाजकल्याण विभागातील दलितवस्ती विभागाचा टेबल पाहत होते. काल ही त्यांनी तोच प्रकार केला. दीपावली सुट्टीनंतर सोमवारी प्रथमच जिल्हा परिषद सुरू झाली अन् स्वामी यांच्या कारवाई मुळे एकच खळबळ उडाली.