‘जय भीम’ चित्रपटातील “त्या” सीनवर आक्षेप; सीन हटवण्याची मागणी
- हेही वाचा ::प्रस्थापित व्यवस्थेला टक्कर देणारा “जय भीम”
थिंक टँक न्यूज नेटवर्क
तमिळ सुपरस्टार सूर्या मुख्य भूमिकेत असलेला जयभीम हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटास दोनच दिवसांत करोडो लोकांनी अमेझॉन प्राईम या OTT प्लॅटफॉर्मवर पाहिले आहे. असे असले तरी या चित्रपटातील एका सिनवर आक्षेप घेतला जात आहे. नेमका आक्षेप काय आहे ते नक्की वाचा.
तमिळ सुपरस्टार सूर्या मुख्य भूमिकेत असलेला जयभीम चित्रपट सध्या अमेझॉन प्राईम या OTT प्लॅटफॉर्मवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. आदिवासी व्यक्तीवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडून न्याय मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या एका वकिलाची संघर्षगाथा या चित्रपटात आहे. प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज हे सुध्दा या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत.
या चित्रपटात प्रकाश राज यांच्यासोबत एक व्यक्ती बोलत असतो. तो हिंदीतून बोलतो. प्रकाश राज त्याच्या कानाखाली लागवतात. त्याला तमिळमधून बोल असे सुनावतात.नेमका हाच सीन अनेकांना आक्षेपार्ह वाटत आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. तिचा असा अपमान करणारा मेसेज या चित्रपटात नको असे अनेकांचे मत आहे.