जगभरातील फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम ठप्प
जगाचा संपर्क तुटला, नेटकऱ्यांत हाहाकार Facebook Surver Down
थिंक टँक डेस्क : फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रामची सेवा सोमवारी रात्री नऊ वाजल्यापासून ठप्प झाली आहे.(Facebook Surver Down) जगभरातील असंख्य देशांमध्ये अचानक घडलेल्या या प्रकारामुळे सोशल मीडिया वापरकर्त्यांमध्ये हाहाकार उडाला आहे. भारतातही बहुसंख्य राज्यांमध्ये ही सेवा ठप्प होती त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे.
लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅॅॅॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक (Facebook, Whatsapp, Instagram server Down)जगभरातील अनेक ठिकाणी ठप्प झाले आहे. याबाबत व्हॉट्सअॅप, फेसबुकने आपल्या वेबसाईटवर मॅसेज लिहीत दिलगिरी व्यक्त केली आहे. “माफ करा, काहीतरी चुकीचं झालं आहे. आम्ही गुंता सोडवण्याचं काम करत आहोत. लवकरच सर्व काही सुरळीत होईल”, असं फेसबुकनं आपल्या मॅसेजमध्ये लिहीलं आहे.

जगाचा संपर्क तुटला
अँड्रॉइड, आयओएस आणि वेबवर फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम हे तिनही अॅप्स ठप्प आहेत. लोकांनी पाठवलेले मॅसेज अर्ध्यावरच अडकले आहेत. वेब आणि स्मार्टफोन या दोन्ही ठिकाणी तिन्ही अॅप चालत नाहीत.
जगभरातच सर्व्हरचा प्रॉब्लेम
डाउन डिटेक्टरवर लोकांनी याबाबतच्या तक्रारी दिल्या आहेत. सुरुवातीला फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम खूप स्लो चालत होते. नेटवर्क प्रॉब्लेम असेल असे समजून अनेकजण ट्राय करत राहिले. मात्र अनेक तास प्रयत्न करूनही सेवा चालत नसल्याने खळबळ उडाली. अखेर जगभरातच फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्याचे स्पष्ट झाले.
भारतात फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रामचे करोडो वापरकर्ते
भारतात फेसबुकचे ४१० दशलक्षाहून अधिक, व्हॉट्सअॅपचे ५३० दशलक्षाहून अधिक वापरकर्ते आहेत. इन्स्टाग्रामचे भारतात २१० दशलक्षाहून अधिक वापरकर्ते आहेत. या तिनही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी भारत मोठी बाजारपेठ आहे. यामध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. काही मिनिटे जरी फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रामची सेवा ठप्प झाली तरी या कंपनीचे करोडो रुपयांचे नुकसान होते.
फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम हा संवादसेतू
सोशल नेटवर्किंग साईटमधील फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम ही माध्यमे प्रचंड लोकप्रिय झाली आहेत. या साईटवर दर सेकंदाला करोडो लोक जोडले गेलेले असतात. फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम हा जणू संवादसेतू बनला आहे.