घरच्यांना न सांगता जोडपं गुपचूप गोव्यात गेलं; व्हॅलेंटाईन डे दिनी समुद्रात अदृश्य झालं

थिंक टँक न्यूज नेटवर्क
प्रेमात आंधळे झालेली तरुणाई कोणत्या स्तराला जाईल ते सांगता येत नाही. अगदी आपल्या कुटुंबालाही अंधारात ठेवून सर्व “कार्यक्रम” सुरू असतात. कुणी गोव्याला, कुणी तिरुपतीला, कुणी मुंबई – पुण्याला तर कुणी जवळच्याच पिकनिक स्पॉटला. जिथं निवांतपणा मिळेल तिथं. असंच एक प्रेमी युगुल घरच्या लोकांना न सांगता गोव्यात व्हॅलेन्टाईन डे साजरा करायला गेलं होतं. प्रेमाच्या धुंदीत आकंठ बुडालेल्या या जोडप्याला समुद्राच्या पाण्याचा अंदाज आला नाही.. अन् ते दोघेही समुद्रात बुडून मृत्यू पावले.
विभू शर्मा आणि सुप्रिया दुबे अशी समुद्रात बुडून मृत्यू पावलेल्या प्रेमी युगुलांची नावे आहेत.

कुटुंबाला न सांगता दूर फिरायला जाणं तरुणाईला साहसी वाटतं. मात्र कधीकधी हे धाडस महागात पडू शकतं. विभू शर्मा आणि सुप्रिया दुबे यांच्यासोबत असाच प्रकार घडला. दोघेही घरी न सांगता व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी गोव्याला गेले. तिथे त्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. विभू आणि सुप्रिया उत्तर प्रदेशचे रहिवासी होते.
सुप्रिया २६, तर विभू २७ वर्षांचा होता. दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी दोघे गोव्याला गेले. गेल्या काही दिवसांपासून दोघे गोव्यात सुट्टी घालवत होते. मात्र त्यांच्या या सहलीची कल्पना कुटुंबाला नव्हती. त्यांचं कुटुंब याबद्दल पूर्णत: अनभिज्ञ होतं.

व्हॅलेंटाईन डे गोव्यात साजरा करण्याची योजना विभू आणि सुप्रियानं फार आधीच आखली होती. त्यासाठी ते दक्षिण गोव्यातल्या प्रसिद्ध पोलोलेम किनाऱ्यावर गेले. मात्र तिथे केलेली मौज मजा त्यांच्या अंगाशी आली. समुद्राच्या लाटांशी खेळता खेळता दोघे बरेच आत गेले. समुद्राची खोली वाढत होती आणि जोडपं पाण्यात दिसेनासं झालं. दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
१४ फेब्रुवारीच्या संध्याकाळी पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. त्यांनी एका पथकासह घटनास्थळ गाठलं. जीवरक्षकांच्या मदतीनं मृतदेह किनाऱ्यावर आणण्यात आले. दोघांना कोकण सोशल हेल्थ सेंटरला नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.
सुप्रिया आणि विभू उत्तर प्रदेशचे रहिवासी होते. सुट्टी घालवण्यासाठी ते गोव्याला आले होते. सुप्रिया कामाच्या निमित्तानं बंगळुरूत, तर विभू दिल्लीत राहायचा. दोघे एकमेकांचे नातेवाईक होते. विभू शर्मा पेशानं ब्लॉगर असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी दोघांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. त्यांना गोव्याच्या सहलीची कोणतीच कल्पना नव्हती. १३ फेब्रुवारीला दोघे समुद्र किनाऱ्यावर फिरताना दिसले होते, असं स्थानिकांनी सांगितलं.
१४ फेब्रुवारीच्या संध्याकाळी पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. त्यांनी एका पथकासह घटनास्थळ गाठलं. जीवरक्षकांच्या मदतीनं मृतदेह किनाऱ्यावर आणण्यात आले. दोघांना कोकण सोशल हेल्थ सेंटरला नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.
हेही वाचा