गुड न्यूज, सोलापूर जिल्ह्यात शाळांची सुट्टी वाढली
१५ नोव्हेंबरपासून पुन्हा ५ दिवसांची दीपावली सुट्टी
थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. नाना हालंगडे
सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांसाठी गुड न्यूज आहे. दिवाळीची सुट्टी आणखी पाच दिवसांनी पुन्हा वाढली आहे. १५ नोव्हेंबर २०२१ ते २० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत आणखी सुट्टी घोषीत करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्हा माध्ममिक शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांनी १२ नोव्हेंबर रोजी जीआर यांनी काढला आहे.
राज्यातील इ .१ ली ते १२ या शाळांना दिवाळी सणाच्या अनुषंगाने दिनांक २८/१०/२०२१ ते १०/११/२०२१ या कालावधीची सुट्टी घोषित करण्यात आलेली होती. त्या अनुषंगाने दिनांक १२/११/२०२१ रोजीची राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) परीक्षा घेता शाळा दिनांक ११/११/२०२१ पासून नियमित सुरु करण्याचे निर्देश होते.
तथापि परिपत्रकामुळे दिवाळी सुट्टी कमी झाल्याने व उर्वरित सुटटयाबाबत स्थानिकस्तरावर निर्णय घेवून सुटटयांचे समायोजन करण्याबाबतचे परिपत्रक लक्षात घेता सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ व शैक्षणिक व्यासपीठ सोलापूर यांच्या निवेदनानुसार २०२१-२२ या शैक्षणिक वर्षामधील उर्वरीत दिवाळी सुटटी दि .१५ / ११ / २०२१ ते २०/११/२०२१ या कालावधीत घेण्यात यावी, असे या आदेशात नमूद केले आहे.